Monday, June 27, 2011

मी आणि violin

नीट वाजतच नव्हते violin. Positions बरोबर होत्या....bow हि perfect होता पण बिनसले होते काहीतरी...
हवे तसे सूर उमटतच नव्हते...
.
.
खूप दिवसांनी लिहितेय ब्लॉग वर. हे काही नवीन नाही म्हणा, पण ह्या वेळी आळशीपणा एवढेच कारण नव्हते. काही सुचत नव्हते असेही नाही...
लिहायला सुरुवात हि केली बरेचदा...पण दोन चार शब्द लिहून झाल्यावर, लिहावसे वाटेच ना...
.
.
खूप काही try केले...तारा पुसून घेतल्या...bow चे tension कमी जास्त करून पाहिले...पण काही केल्या सूर नाही सापडले.
.
.
खूप पसारा झाला होता आतल्या आत. अस्ताव्यस्त पडले होते सगळे विचार...एक मेकात अडकून गुंता झाला होता सगळ्याचा.
काही बोलायला गेले कि भांडण च व्हायचे...माझ्या सगळ्या बोलण्याचा उलटा अर्थ च निघत होता.
.
.
एवढे सगळे केल्या नंतर मात्र violin पेटीत ठेऊन दिले. नाहीच वाजवायचे मला...हड्ड...गेले उडत...
.
.
गप्प च बसणारे आत्ता. कोणाशी काही बोलायचेच नाही मुळी मला.
.
.
पण कित्ती दिवस बंद ठेवणार ना...violin...पेटीत. कसे तरीच व्हायला लागले. वाजवत राहिल्या शिवाय कसे कळणार कुठे काय बिनसतंय ते...?
.
.
बोलायला हवे... मनातला कचरा काढून टाकल्या शिवाय नव्या साठी जागाच नै उरणार...ज्याच्या वर राग होता त्याला तसे स्पष्ट सांगून टाकले.
हे जे काही तू वागला आहेस...ते नाही आवडलेय मला. उग्गाच गोड गोड राहण्या साठी खोटे बोलून काय फायदा...?
ना धड चांगले वागता येत...आणि ना धड शिव्या घालता येत. आणि मग असा त्रास होत राहतो.
.
.
situation कोणतीही, कशीही असली तरी, पळून जाण्याने काहीच सध्या होत नाही...हे कळतेय हळू हळू...
बोलायला हवेच...घुसमट वाढवण्या पेक्षा बोलून मोकळे झालेलं बरे,
.
.
Tuning केलेय आत्ता...सूर हि सापडतायत...छानसे काही वाजेल बहुदा आत्ता. आणि काही झाले तरी...आत्ता पेटीत नै बंद करायचे...हेही ठरलेय माझे. :-)