Sunday, July 17, 2011

भ्याड हल्ला (???)

बॉम्बस्फोटानंतर जागो जागी तत्परतेने श्रद्धांजली, निषेधाचे फलक लागले. ( इतकी तत्परता हवी तिथे दाखवली असती तर...असो...)
तर त्यातल्या एका फलकात "बॉम्बस्फोटाच्या भ्याड हल्ल्याचा" निषेध केला होता.
"भ्याड हल्ला"...???
ते इथे तुमच्या देशात तुमच्या नाक्कावर टिच्चून दिवाळीत फटाके फोडावेत इतक्या सहजतेने बॉम्बस्फोट करतात...
तुम्ही त्यांचे काहीही वाकडे करू शकत नाही ह्याची जणू खात्री बाळगून येता जाता तुम्हाला टपल्या मारतात.
तुम्ही षंढपणे 'प्रत्येक हल्ला सरकार रोखू शकत नाही..." अशी तुमच्या नाकर्तेपणाची जाहीर कबुली देता...
आणि त्यांच्या हल्ल्यांना भ्याड हल्ले कसले म्हणता...?
तुम्ही नाकर्ते आहात राव...ते भ्याड वैगरे मुळ्ळीच नाहीयेत...मुळ्ळीच नाही :-( :-( :-(

Monday, June 27, 2011

मी आणि violin

नीट वाजतच नव्हते violin. Positions बरोबर होत्या....bow हि perfect होता पण बिनसले होते काहीतरी...
हवे तसे सूर उमटतच नव्हते...
.
.
खूप दिवसांनी लिहितेय ब्लॉग वर. हे काही नवीन नाही म्हणा, पण ह्या वेळी आळशीपणा एवढेच कारण नव्हते. काही सुचत नव्हते असेही नाही...
लिहायला सुरुवात हि केली बरेचदा...पण दोन चार शब्द लिहून झाल्यावर, लिहावसे वाटेच ना...
.
.
खूप काही try केले...तारा पुसून घेतल्या...bow चे tension कमी जास्त करून पाहिले...पण काही केल्या सूर नाही सापडले.
.
.
खूप पसारा झाला होता आतल्या आत. अस्ताव्यस्त पडले होते सगळे विचार...एक मेकात अडकून गुंता झाला होता सगळ्याचा.
काही बोलायला गेले कि भांडण च व्हायचे...माझ्या सगळ्या बोलण्याचा उलटा अर्थ च निघत होता.
.
.
एवढे सगळे केल्या नंतर मात्र violin पेटीत ठेऊन दिले. नाहीच वाजवायचे मला...हड्ड...गेले उडत...
.
.
गप्प च बसणारे आत्ता. कोणाशी काही बोलायचेच नाही मुळी मला.
.
.
पण कित्ती दिवस बंद ठेवणार ना...violin...पेटीत. कसे तरीच व्हायला लागले. वाजवत राहिल्या शिवाय कसे कळणार कुठे काय बिनसतंय ते...?
.
.
बोलायला हवे... मनातला कचरा काढून टाकल्या शिवाय नव्या साठी जागाच नै उरणार...ज्याच्या वर राग होता त्याला तसे स्पष्ट सांगून टाकले.
हे जे काही तू वागला आहेस...ते नाही आवडलेय मला. उग्गाच गोड गोड राहण्या साठी खोटे बोलून काय फायदा...?
ना धड चांगले वागता येत...आणि ना धड शिव्या घालता येत. आणि मग असा त्रास होत राहतो.
.
.
situation कोणतीही, कशीही असली तरी, पळून जाण्याने काहीच सध्या होत नाही...हे कळतेय हळू हळू...
बोलायला हवेच...घुसमट वाढवण्या पेक्षा बोलून मोकळे झालेलं बरे,
.
.
Tuning केलेय आत्ता...सूर हि सापडतायत...छानसे काही वाजेल बहुदा आत्ता. आणि काही झाले तरी...आत्ता पेटीत नै बंद करायचे...हेही ठरलेय माझे. :-)

Friday, April 8, 2011

सुट्टी

सुट्टी...सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा विषय. आणि आजकाल काहींच्या हेव्याचा पण... ;-)
तर...सुट्टीत एक सर्व साधारण प्रश्न सतत येऊन कानाला बोचत असतो. मग आत्ता काय करणार सुट्टीत? अर्रे... वर्षभर इतके डोकी फोडत असतो...तर सुट्टीत हि काहीतरी करायलाच हवे का? शांत निवांत बसूच नये कि काय माणसाने?
( अर्थात हे माझ्या सारख्या महा आळशी लोकांचे मनोगत आहे तेव्हा समजून घ्या...) पण एकूणच मुलांनी सतत गुंतून पडावे
असे का वाटते राव सगळ्यांना?
हे शिबीर ते courses...एक न हजार गोष्टी. सुट्टीत मज्जा करण्याची concept नाहीच उरलीये बहुदा आत्ता.
( बहुतेकदा मुलांचा हट्ट असतो वैगरे सगळे ठीके...मी पण केलीयेत बर्रीच नाटके सुट्टीत.) पण Forcefully, केवळ मुले अडकून रहावीत ह्या उद्देशाने आई बाबा इकडे तिकडे नवे नोंदवतात ना मुलांची ते नाही आवडत मला...
कधी कधी तर ह्याचा मुलगा हे करतोय आणि त्याची मुलगी ते करतेय म्हणून आई बाबा मुलांना पिटाळतात सगळीकडे ते तर भार्रीच
irritating असते.
आजू बाजूची लहान मुले खरेतर इतर वेळी जास्त मजा करत असतात, असे general observation आहे माझे.
सुट्टी आई बाबांच्या म्हणण्या प्रमाणे च घालवली जाते शक्यतो...
माझ्या मते...सुट्टी झोपायला, खेळायला, काही न करता आळशी पणे बसून राहायला, TV वर उग्गाच काहीही nonsense बघायला, तासान तास फोन वर बोलायला आणि आई बाबांना न आवडणार्या अनेक गोष्टी करून वर "...मग सुट्टी सुरु आहे न माझी" असे ऐकवायला असते.
त्यामुळे मी तरी "काहीही" न करता छान हात पाय पसरून आराम करतेय सुट्टीत...उन्हाळ्याची सुट्टी ह्या साठीच तर असते न...what say? ;-)