बॉम्बस्फोटानंतर जागो जागी तत्परतेने श्रद्धांजली, निषेधाचे फलक लागले. ( इतकी तत्परता हवी तिथे दाखवली असती तर...असो...)
तर त्यातल्या एका फलकात "बॉम्बस्फोटाच्या भ्याड हल्ल्याचा" निषेध केला होता.
"भ्याड हल्ला"...???
ते इथे तुमच्या देशात तुमच्या नाक्कावर टिच्चून दिवाळीत फटाके फोडावेत इतक्या सहजतेने बॉम्बस्फोट करतात...
तुम्ही त्यांचे काहीही वाकडे करू शकत नाही ह्याची जणू खात्री बाळगून येता जाता तुम्हाला टपल्या मारतात.
तुम्ही षंढपणे 'प्रत्येक हल्ला सरकार रोखू शकत नाही..." अशी तुमच्या नाकर्तेपणाची जाहीर कबुली देता...
आणि त्यांच्या हल्ल्यांना भ्याड हल्ले कसले म्हणता...?
तुम्ही नाकर्ते आहात राव...ते भ्याड वैगरे मुळ्ळीच नाहीयेत...मुळ्ळीच नाही :-( :-( :-(
होय, हल्ला तर भ्याड आहेच... सरकार नाकर्ते आहे हे सुद्धा मान्य..
ReplyDeleteहल्लेखोरांनी आधी न सांगता पाठीवर केलेलं भ्याड कृत्य आहे हे...
आनंदजी तुम्हाला म्हणायचे आहे काय? हल्लेखोरांनी आधी सांगून मग हल्ला करायला हवा होता काय???? सरकार नाकर्ते असतीलही.. पण नागरिक तरी कुठे सजग आहेत. आपण सजगपणा दाखविला तर असे हल्ले रोखता येतील....
ReplyDeleteu r right maithili
ReplyDelete@ नंदकुमार - नागरिकांनी सजगपणा दाखवायचा म्हणजे नेमकं काय करावं? स्पष्ट करून सांगाल?
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteएकदम बरोबर मैथिलि.....आमच्याच शहरात आम्हाला भिती.....
ReplyDeleteWell, I have come across to your blog very late ,
ReplyDelete(I think , I read your this blog, late as well...)
Completely agree with your statement !!!
I never realize "भ्याड" word ....
every were they use this word...
but they are not भ्याड , we are भ्याड !!!
similar post I have put in my blog too...
(http://nilsmania.blogspot.com/2011/07/basts-in-mumbaiagain.html)