माझा अव्यवस्थितपणा...खरेतर ह्या विषयावर पोस्ट लिहिणे म्हणजे स्वताच स्वत:चा कचरा करून घेण्या सारखे आहे...पण अत्ता मी आहे अशी तर आहे...काय करणार...? आणि तसेही इथे सगळे "आपलेच" आहेत...सो, लिहुयात बिनधास्त, असा विचार करून मी लिहितेय एकदाचे...!!!
मी ह्या विषयावर लिहिणार आहे असे जेव्हा माझ्या एक मैत्रिणीला सांगितले तेव्हा ती म्हणाली , " ब्लॉग वर प्रबंध पण लिहिता येतो...? " सो, माझ्या बाबतीत ह्या विषयाचा आवाका केवढा मोठा आहे हे तुम्हाला कळले असेलच...पण काळजी करू नका...एवढा वेळ नाही पकवणार मी ( शेवटी स्वत:ची लाज किती काढायची याला पण लिमिट आहे न) तर, मी अत्यंत पसारेबाज, अव्यवस्थित , impossible, horrible, त्रासदायक अशी कार्टी आहे...( असे इतरांचे मत आहे माझ्या बाबतीत) :(
माझ्या गोष्टी कधी जागेवर मिळत नाहीत, मी घरी असले की घराचा उकिरडा होतो, माझे कपाट उघडल्या नंतर जर कोणी ढाल घेउन उभे नाही राहिले तर त्यांची खैर नाही, माझ्या कपाटातून किंवा माझा वावर असलेल्या कुठल्याही जागेतून हवी ती गोष्ट किमान एक तासात शोधून काढणार्या व्यक्तीला पुरस्काराने सन्मानित करायला हवे, मला जर Nepolian भेटला असता तर त्याने सगळ्या Alphabetical orders चे नियम मोडून Dictionery च्या पहिल्या पानावर IMPOSSIBLE हा शब्द लिहिला असता...अशीही काही मते आहेत त्यांची माझ्या बाबतीत... ( एक छोट्याशा मुलीला कित्ती ऐकवतात ही माणसे?? )
माझ्या ह्या गुणा मुळे मी रोज न चुकता सकाळ, दुपार, संध्याकाळ आई बाबा आणि मित्र मैत्रिणीन्च्या शिव्या खात असते...अर्थात त्याना पूर्ण आधिकार आहे ह्याचा...!!! ( का ते सांगत नाही इथे...नाहीतर सहनुभूतिचा पूर येइल...) पण खर्रेच खूप त्रास दिलाय मी त्याना...
शाळेत असताना माझ्या मैत्रिणी माझी bag भरायच्या..,माझी बेंच पार्टनर तर बिच्चारी टिचकी मारली तरी खाली पडेल इतक्य कमी जागेत बसायची...माझ्या वस्तु सगळा वर्ग मिळून सम्भाळायचा...दहावीत असताना तर आई ने दोन फ्रेंड्स ना जबाबदारी दिलेली माझ्या वस्तुंची...त्या माझे हॉल टिकेट, stationery सगळे चेक करून, bag मधे भरून मगच बाहेर पडायच्या...
हे सगळे झाले त्यांच्या पॉइंट ऑफ़ view मधून, पण माझे म्हाणणे असे आहे की ह्यातच जास्त मज्जा येते...Its fun...म्हणजे बघा ना सगळ्या वस्तु जर जागच्या जागी सापडायला लागल्या तर सकाळी घरून निघतानाची घाई गड़बड़, कटकट , स्वत:लाच घातलेल्या शिव्या , सैरभैर पणा miss कराल ना? घर "घर" वाटेल? कधीतरी एकदा आई चा ओरडा खाल्ल्या नंतर किंवा परिस्थिति अगदीच हाताबाहेर गेल्या नंतर आवरावा लागलेला पसारा...आणि तो आवरताना खूप दिवसांपूर्वी हरवलेली एखादी वस्तु मिळाल्या नंतरचा आनंद सुद्धा miss कराल न??? आणि इतकेच काय तुमच्या आजू बाजुच्या 'अशा' व्यक्ति सुधारल्या न तरी त्यांचा पसारा तुम्ही खात्रीने miss कराल...!!! :)