माझा अव्यवस्थितपणा...खरेतर ह्या विषयावर पोस्ट लिहिणे म्हणजे स्वताच स्वत:चा कचरा करून घेण्या सारखे आहे...पण अत्ता मी आहे अशी तर आहे...काय करणार...? आणि तसेही इथे सगळे "आपलेच" आहेत...सो, लिहुयात बिनधास्त, असा विचार करून मी लिहितेय एकदाचे...!!!
मी ह्या विषयावर लिहिणार आहे असे जेव्हा माझ्या एक मैत्रिणीला सांगितले तेव्हा ती म्हणाली , " ब्लॉग वर प्रबंध पण लिहिता येतो...? " सो, माझ्या बाबतीत ह्या विषयाचा आवाका केवढा मोठा आहे हे तुम्हाला कळले असेलच...पण काळजी करू नका...एवढा वेळ नाही पकवणार मी ( शेवटी स्वत:ची लाज किती काढायची याला पण लिमिट आहे न) तर, मी अत्यंत पसारेबाज, अव्यवस्थित , impossible, horrible, त्रासदायक अशी कार्टी आहे...( असे इतरांचे मत आहे माझ्या बाबतीत) :(
माझ्या गोष्टी कधी जागेवर मिळत नाहीत, मी घरी असले की घराचा उकिरडा होतो, माझे कपाट उघडल्या नंतर जर कोणी ढाल घेउन उभे नाही राहिले तर त्यांची खैर नाही, माझ्या कपाटातून किंवा माझा वावर असलेल्या कुठल्याही जागेतून हवी ती गोष्ट किमान एक तासात शोधून काढणार्या व्यक्तीला पुरस्काराने सन्मानित करायला हवे, मला जर Nepolian भेटला असता तर त्याने सगळ्या Alphabetical orders चे नियम मोडून Dictionery च्या पहिल्या पानावर IMPOSSIBLE हा शब्द लिहिला असता...अशीही काही मते आहेत त्यांची माझ्या बाबतीत... ( एक छोट्याशा मुलीला कित्ती ऐकवतात ही माणसे?? )
माझ्या ह्या गुणा मुळे मी रोज न चुकता सकाळ, दुपार, संध्याकाळ आई बाबा आणि मित्र मैत्रिणीन्च्या शिव्या खात असते...अर्थात त्याना पूर्ण आधिकार आहे ह्याचा...!!! ( का ते सांगत नाही इथे...नाहीतर सहनुभूतिचा पूर येइल...) पण खर्रेच खूप त्रास दिलाय मी त्याना...
शाळेत असताना माझ्या मैत्रिणी माझी bag भरायच्या..,माझी बेंच पार्टनर तर बिच्चारी टिचकी मारली तरी खाली पडेल इतक्य कमी जागेत बसायची...माझ्या वस्तु सगळा वर्ग मिळून सम्भाळायचा...दहावीत असताना तर आई ने दोन फ्रेंड्स ना जबाबदारी दिलेली माझ्या वस्तुंची...त्या माझे हॉल टिकेट, stationery सगळे चेक करून, bag मधे भरून मगच बाहेर पडायच्या...
हे सगळे झाले त्यांच्या पॉइंट ऑफ़ view मधून, पण माझे म्हाणणे असे आहे की ह्यातच जास्त मज्जा येते...Its fun...म्हणजे बघा ना सगळ्या वस्तु जर जागच्या जागी सापडायला लागल्या तर सकाळी घरून निघतानाची घाई गड़बड़, कटकट , स्वत:लाच घातलेल्या शिव्या , सैरभैर पणा miss कराल ना? घर "घर" वाटेल? कधीतरी एकदा आई चा ओरडा खाल्ल्या नंतर किंवा परिस्थिति अगदीच हाताबाहेर गेल्या नंतर आवरावा लागलेला पसारा...आणि तो आवरताना खूप दिवसांपूर्वी हरवलेली एखादी वस्तु मिळाल्या नंतरचा आनंद सुद्धा miss कराल न??? आणि इतकेच काय तुमच्या आजू बाजुच्या 'अशा' व्यक्ति सुधारल्या न तरी त्यांचा पसारा तुम्ही खात्रीने miss कराल...!!! :)
छान..! चालू दे असेच...'लग्नानंतर ही अशीच वागणार आहेस का?' - हा टिपिकल आईचा डायलौग मिस झाला :P
ReplyDeleteहा हा छान... "अव्यवस्थित चीत्तानाम् अनार्थोपि भयंकरः" (श्लोकातले शब्द चुकले असण्याची प्रचंड शक्यता आहे.) असा काहीतरी श्लोक बाबा नेहमी ऐकवायचे त्याची आठवण झाली :)
ReplyDeleteअव्यवस्थितपणा Rocks!
ReplyDeleteसगळच व्यवस्थित झाल तर बोंबच होईल, गाडीची किल्ली जर जागच्या जागी सापडली तर विश्वासच बसणार नाही.
अव्यस्थितपणा हा असावाच त्याशिवाय व्यवस्थितपणाची किंमत कळत नाही......पसारा करणार कोणी तरी आहे म्हणुन आवरण्यात मजा आहे....SO लगे रहो...:) :) :)
ReplyDeleteSagar dada are majhi aai ase nahi bolat kadhi... :)BTW, chalu tar rahanaarach he ase... ;)
ReplyDeleteHeramb dada, Kaka tula he aikavayache mhanaje tu suddha asach hotas tar... :P hhhmmm...hhhmmm....
ReplyDeleteHe nahi lihilayas te tujhya tya post madhe...!!! Phakt Aaditey che udyog lihileyas...!!! ;)
Btw, tu suchavale hotas na ki lihi tujhya pan pasarya baddal mhanun hi post takali aahe... :)
अव्यवस्थितपणा Rocks! Thts wt I wanna say... ;)
ReplyDeleteChala mala samajun ghenare aahet tar ithe... :)
Manamouji dada,
ReplyDelete>>>पसारा करणार कोणी तरी आहे म्हणुन आवरण्यात मजा आहे
I wish majhya aaju bajuche sagale jan itke sweet aste...!!! :)
हे हे मस्त...तुझा हा दादापण असाच आहे..पण एकदा आईने अशी शाळा घेतली की..असो :)
ReplyDeleteतूझे लाड करणारे आम्ही आहोत तेव्हा हक्क आहे तुझा..सो लssssगे रहो
:D Aai ne shala ghetali na... Majhi tar sagalech ghetat...
ReplyDeleteNwys...Thanks... For d encourgmnt...!!! :)
एकदम राजेशाही थाटात शाळेत शिकलीस ग तु... :)
ReplyDeleteमी पण आजही कितीही तयारी केली तरी कुठेही बाहेर निघतांना घाइ गडबड करतोच...असो एकंदरीत मी तुझ्याच पार्टीचा आहे...
तुझा प्रबंध वाचल्यानंतर असं वाटतयं की तुझ्याजवळ खुप रिकामा वेळ आहे एखादी वस्तु शोधत बसायला. पण खरं सांगू हि वाईट सवय आहे.वाईट सवय लवकर लागते आणि चांगली उशिरा म्हणून वेळीच सावध हॊ. तु छान लिहीतेस. तुझा blog आवड्ला.
ReplyDeleteDeven dada, yoohoo...tu pan majhyach bajucha na... Sahiye...!!! Baryach goshtit samya aahe aapalyat...!!! ;)
ReplyDeleteAani Kasala Rajeshahi that re...Hya sathi purepur shivhya khallyat mi...tyanchi fee mhanun... :D..!!!
Vaibhav dada, Actually mala hi mahityey hi savay vaait aahe te...pan kay karu...sutata sutat nahi...aani mulat pasaryatach goshti sapadanyachi savay zaliye atta...!!! So, phar wel nahi laagat mala, majhya vastu shodhayala...!
ReplyDeleteBtw, Thank you...!!! Aani ho welcome to the Blog...!!! Yet raha asech ithe...!!! :)
लेख मस्त आहे
ReplyDeleteपण ...
मला अव्यवस्थितपणा अजिबात खपत नाही
माझ्या बूटात कालचे ओले सॉक्स कधीच सापडणार नाहीत :)
मागच्या मागच्या सोमवारी खाल्लेली शेंगदाण्याची पुडीही माझ्या बॅगेत गुदमरलेली सापडणार नाही :)
माझ्या खणात जर दहा पेनं असतील, तर त्याच्यातली दोन बिना बुडाची, तिघांही टोपणं हरवलेली, एखादं शाईने बरबटलेलं,
दोन तुटलेली आणि इतर दोघांची टोपण आपापसात अदलाबदली झालेली असं कधीच नसतं :)
मी कुठल्याही परिक्षेच्या आधी घरातल्यांपैकी कोणालाही पेन, रबर, पट्टी वगैरे आणायला पिटाळत नाही :)
माझ्या ऑफिसमधल्या आणि घरच्या पीसीवर सरसकट सगळं डेस्कटॉपवर कधीच सेव्ह होत नाही वेगवेगळ्या फोल्डर्समध्ये वर्गवारी केलेली असते :)
ऑफिसने दिलेल्या पिण्याच्या पाण्याच्या बाटलीत मला कोणीकोणी दिलेली फुलं मी ठेवत नाही :)
मला आजवर ऑफिसमध्ये फ्रायडे ड्रेसिंगबाबत कुणी सुनावलेलं नाही, खण कपड्यांनी वाहून चालला असताना नानाविध मेसेजेस देणारी राउंडनेक टिशर्टच मला नेमकी सापडावित असं कधीच झालेलं नाही :)
माझ्या व्यवस्थितपणाची शपथ मी खरं बोलतोय :)
Baaaap rrreee.....!!! Itka vyavasthitpana...Mahan aahe tu...!!! :)
ReplyDeletekaahi hi aso... haa lekh maatra tu ekdum 'vyavsthit' lihila aahes :-)
ReplyDeleteOhh...Thanks योगेश दादा...N WELCOME here....asech yet raha ithe... :)
ReplyDeleteदे टाळी, टोटली मिलते जुलते कॅरॅक्टर्स आपण ;)
ReplyDeletesahiye! Avyvsthitpanamule aapn kaay kaay miss karto he aata mi aaila sangtoch :D :D
ReplyDeleteYoohooo....आनंद दादा...ये हुई ना बात... :) :) :)
ReplyDeleteHappy to know that....!!! :D
दीप दादा, अरे आई ला हे सगळे पटले असते तर मग अजुन काय हवे होते...? हे असे सगळे मी जर तिच्या समोर ओकले न तर....असो...थोडक्यात हा साहसी विचार सोडून देणे च इष्ट...!!! :D
ReplyDeleteहाहाहा.. सगळेच असे असतात गं. (म्हणजे बहुतेक सगळे. काही अपवादही असतात.) मीही असाच आहे. माझ्या वस्तूंपैकी मी सांगितलेली वस्तू एक तासात शोधून देणार्याचा मी शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करायला तयार आहे... ;-)
ReplyDeleteWynn Casino & Resort, Las Vegas - Mapyro
ReplyDeleteWynn Casino & Resort. 255 Fremont St. Las Vegas, NV 청주 출장마사지 89109. Directions. (702) 770-3000. Call 안성 출장마사지 Now · View Directions · More Info. 서울특별 출장마사지 Hours, Accepts Credit 통영 출장마사지 Cards, 동해 출장마사지