Thursday, June 10, 2010

पाउस

कित्ती सही वाटतय न, पहिला पाउस आलाय....! हिरवीगार झाडे, चकचकीत रस्ते, raincoat छत्र्या घेण्यासाठी दुकानात झालेली गर्दी, पाणी साठलेल्या प्रत्येक खड्ड्यात दोन्ही पाय एकत्र करून उडी मारणारी लहान मुले, एकाच छत्री तून जवळ जवळ भिजतच चालणारी couples, हे सगळे पाहणे सुद्धा कित्ती रेफ्रेशिंग असते नै...!!!
पण अर्थात सगळ्यानाच पाउस इतकाच आणि असाच सुंदर वाटतो असे नाही... मला तर आधी पटायचेच नाही की पाउस न आवडणार्या व्यक्ति सुद्धा असतात म्हणून... पण माझ्या आजू बाजुलाच अशी खूप लोक आहेत ज्याना पाउस conditionally आवडतो.
म्हणजे, पाउस आवडतो पण फक्त खिड़कीतून बघायला, सगळे आवरून घराबाहेर पडल्यानंतर पडणारा पाउस नाही आवडत, कॉलेज ला जाताना पडलेला पाउस नाही आवडत, पण येताना पडलेला ठीक वाटतो, पावसातला गारवा छान वाटतो पण चपलेत शिरणारे पाणी नै आवडत... बाप रे...कित्ती त्या terms and conditions पाउस न आवडण्याच्या... असो पाउस न आवडणे काही पाप नाहीये...आणि मी काही कोणाला पाउस आवडण्याची जबरदस्ती सुद्धा नाही करू शकत पण माझ्या साठी हे सगळे खरेच खूप confusing आहे... सव्वा सात ला पडलेला पाउस वाईट वाईट असतो आणि साडे दहा ला पडलेला पाउस छान छान...असे कसे काय...???
मला तर बुवा कधीही , कुठेही, कसाही पडलेला पाउस आवडतो...!!! माझ्या साठी तो सव्वा सात, साडे नऊ, पावणे दहा प्रत्येक वेळी सुंदर च असतो...!!! घरातून बाहेर पडताना, घरी परत येताना कधीही आलेला पाउस मी सारखाच enjoy करते...!!! पावसाच्या प्रत्येक सरीत माझ्या साठी दर वेळी आनंद च आनंद बरासत असतो...!!! So, तुम्हला कसा आवडतो पावसाळा...??? with conditions की without any condition...???
असो तुम्हाला पावसाळा कसाही आवडत असला तरी हा पावसाळा तुम्हला खूप खूप मजा मस्तीचा आणि आनंदाचा जावो ही सदिच्छा.....!!! :) Happy Mansoon...!!!

36 comments:

 1. Paus khup sahi asto... ani pahilya pavasat bhijanya evadhe sukh nahi... in fact kuthalya hi pavasat bhijanya evadhe sukh nahi... except office la jatana padanara paus.. (conditional!!)
  Happy Monsoon to u too..

  ReplyDelete
 2. He..he... Gaurav dada agdi khare, Pawasat bhijanya itke sukh nahi... :)

  ReplyDelete
 3. मैथिली, मला दीर्घ उन्हाळ्यानंतर आलेला (कुठल्याही वेळी) पाऊस एकदम चालतो.. मग हळूहळू त्याचा सुद्धा कंटाळा यायला लागतो.. मग कंडीशनल जास्त आवडू लागतो....
  माझा आवडता ऋतू हिवाळा..(फक्त भारतातला) उन्हाळा सगळ्यात नावडता... पावसाळा दोघांच्या मध्ये एकदम... ;-)

  ReplyDelete
 4. मैथिली, सहीच गं. मलाही पावसाळा खुपच आवडतो. कसाही आणि कधीही.... नो कंडिशन्स... :) रात्रीच्या वेळी मुसळधार पडणारा पाऊस रस्त्याच्या दिव्यच्या प्रकाशात पाहायचा... आणि त्या धारा रस्त्यावर पडून पेट्रोल-धूळ-मातीच्या मिश्रणातून तयार होणारे इंद्रधनूही... तुषार झेलत गॅलरीत उभे राहायचे...

  ReplyDelete
 5. पावसाला टर्म्ज़ कंडीशन्स कधीच नाही...आता पहाटे ४ वाजता चिक्कार पावसात भिजत आलोय मस्त...आता सगळीकडे हिरवळ दाटेल, मातीचा मस्त सुगंध पसरेल, पावसात टपरीवरचा चहा आणि गरम गरम कांदा भजी-वडे खाणार (हादडणार), ट्रेकिंग सुरू करणार, गावाकडे शेती चालू होईल, धरण-नद्या भरतील..एवढा चांगल्या पावसाला कंडीशन्स कश्या घालू तूच सांग :)

  ReplyDelete
 6. माझंही तुझ्यासारखंच मत होतं आधी पण आता जिथे राहाते तिथे वर्षभर पाऊसच असतो त्यामुळे मत बदलावं (की जागा??) अशा मताला आलेय...असो..
  पहिल्या आणि मान्सुनच्या पावसाची मज्जाच न्यारी....यंज्व्याय...

  ReplyDelete
 7. मला पाऊस आवडतो.. परंतु खालील अटी आहेत.

  १. रात्री ११ ते सकाळी ६ मधेच पडावा.
  २. सगळ्या शेतांवर आणि धरणांवर जोरदार बरसावा. कधीही आणि कुठल्याही वेळी चालेल. आमची काही ना नाही. परंतु उगाच रस्त्यांवर पडून चिकचिकाट व्हायला नको.
  ३. ट्रेकला गेलो असलो की दिवसभर नॉनस्टॉप पडावा.
  ४. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात एकेकदा इतका पडावा की गाड्या बंद पडतील.
  ५. वरच्या अटीतला पाऊस सोमवारीच पडावा. किंवा फार तर शुक्रवारी.
  ६. मी यावर एक पोस्ट लिहिणार होतो पण राहून गेली आणि आजच्या माझ्या पोस्टमध्ये म्हटल्याप्रमाणे ड्राफ्टमध्ये पण नव्हती. त्यामुळे विसरून गेलो होतो. लवकरच लिहीन. उरल्या सुरल्या अटींसहीत..

  ReplyDelete
 8. Anand dada, Are Hivala mala suddha khoop aawadato..pan paawasala jast aawadanyache karan mhanaje Irritating unhala sampalyachi jaaniv to karun deto... :)

  ReplyDelete
 9. Husshhh....Chala koni tari aahe majhya barobar majhya team madhye...!!! Mala tar vatale hote ki ithe suddha conditional walyanchi mejority...
  Aani kitti sunder pratikriya aahe ho tumachi...Don shabdat sagalya pawasalyache varnan...sahich...!!!
  >>>रात्रीच्या वेळी मुसळधार पडणारा पाऊस रस्त्याच्या दिव्यच्या प्रकाशात पाहायचा... आणि त्या धारा रस्त्यावर पडून पेट्रोल-धूळ-मातीच्या मिश्रणातून तयार होणारे इंद्रधनूही... तुषार झेलत गॅलरीत उभे राहायचे...
  He sagale visarunach gele ki mi.... :)
  Te rastyawarache indrdhanu baghayala mala ajunahi aawadate... :)

  ReplyDelete
 10. Chala ajun ek member milala tar... ;)
  Suhas dada, bagh na evadhya sunder paawasala kasha kaay conditions ghalayachya...???
  BTW, kar kar majja kar hya paawasalyat...N miss me...!!! Njoy Mansoon... :)

  ReplyDelete
 11. Aparna taai, tujhya kade conditions ghalayala valid reason ahe tar...aso, Thnks for comment...!!!

  ReplyDelete
 12. Arre Heramb dada, agdi SAME TO SAME mat aahe majhya aai che...!!! Sagalya ati agdi sarakhya...
  Shetavar padava, rastanwar padu naye, outing la gele ki padava, July - Augst madhye bharpur padun gadya band karavyat...kitti tya ati paaus aawadanyachya...!!! Husshhh...N I ws Thinking my mom is only one... :)
  Aso, tu lihi lawakarat lawkar...Mi waat baghatyey...!!!

  ReplyDelete
 13. पहिला पावूस मी तर खूप यंजोय केला... माझा बझ्झ पहिला नव्हतास का?मस्त भिजलो,होड्या तयार केल्या ...मज्जा

  ReplyDelete
 14. Are naahi pahila...baghate atta...!!! :)

  ReplyDelete
 15. मस्त आहे ब्लॊगचे नवे रुप(?) :) पावसाळा थीम.
  आपला पण पावसाळा आवडीचा. पाऊस फ़ार न पडावा पण.. नाहीतर बोर होतं... :(

  बाकी, इथं वर्षात कधीही वर्षा होऊ शकते, चारी बाजुना समुद्र असल्यानं, त्यामुळं नेहेमी ब्यागेत छत्री असतेच. (हे उगाचच न विचारता... माफ़ कर ;) )

  लिहीत रहा... :)

  ReplyDelete
 16. मला पहिला पाऊस खुप आवडतो. कारण ऊन्हामुळे आलेला थकवा , कंटाळा आणि मरगळ जाते. सर्व स्वच्छ होते.

  ReplyDelete
 17. Your blog is cool. To gain more visitors to your blog submit your posts at hi.indli.com

  ReplyDelete
 18. Thanks Ruyam dada...Hhhmmm...are baryach janana hote boar phar paaus padala ki...
  Aani na vicharata sangitales te changlech keles ki...tyat maafi vaigare kaay...??? :)

  ReplyDelete
 19. Vaibhav dada, Aho ho na सर्व स्वच्छ होते he mukhya karan Paawasala aawadanyache...sagale kase nave nave vatate...!!! :)
  Aso, Blog war swagat...yet raha asech...!!!

  ReplyDelete
 20. आपल एकदम अनकंडीशनल प्रेम आहे पाउसावर...त्यादिवशी रात्री ११:३० च्या सुमारास पाउस आला (भिजण्यासारखा पहिलाच)तेव्हा मला त्यापासुन दुर राहणे शक्यच नव्हते.त्यामुळे त्यात मिसळुन वेड्यासारखा भिजत भिरलो कॉल्नीत एकटाच...

  ReplyDelete
 21. मस्त लिहीलं आहेस गं... मलाही तसा पाऊस खिडकीतुनच बघायला आवडतो.. ठाण्यात भिजायची मज्जा नाही.. पावसात भिजायचं असेल तर आमच्या कोकणात खरी धमाल असते राव :)

  ReplyDelete
 22. Jaswandi taai, mag ekda tujhya ghari ne mala.....pawasat bhijayala...!!! :)

  ReplyDelete
 23. इथे मुंबईत आत्ता धड आला गं..म्हणून उशिराने कमेंटतोय...;)
  अगं मुंबईत नव्हतो..म्हणून थोडा उशीर...
  मस्त लिहिलंयस...
  पाऊस पाऊस असतो...सगळ्या चित्तवृत्ती फुलवणारा!

  ReplyDelete
 24. Ok...Ok...!!! Thanks...!!! :)

  ReplyDelete
 25. कसाही असो, ट्रेक असला की पाऊस आवडतोच.

  ReplyDelete
 26. मस्त...मला पण पाऊस कधीही आणि कसाही आवडतो.
  शाळेत असताना 'पहिला पाऊस' निबंध लिहिला होता तेव्हा त्याला बक्षीसही मिळाले होते पण त्यानंतर कॉलेजला आल्यावर पाऊस जास्तच 'सुंदर' होऊ लागला.
  असो. आमच्या काही अटी नाहीत. बाकी हेरंबने लिहिलेल्या पुणेरी पाट्या छान आहेत.

  ReplyDelete
 27. Arre wah...Tujhya suddha kahi ati nahit na... Sahiye..!!!

  ReplyDelete
 28. लेटेस्ट पोस्ट उडवलीस?

  ReplyDelete
 29. व्वा. छान.
  पाऊसवेड्यांबाबद्दल मला नेहमीच आपुलकी वाटत आली आहे.

  ReplyDelete
 30. Gangadhar kaka, Same Here... :-)

  ReplyDelete
 31. Heramb dada , Ho arre...Tyache ase jhale ki tya post madhun mala je sangayache hote na ( Moral of the story) tyachya war puresa focus ch nahi padala....main concept neet nahi mandata aali... ase mala vatale mhanun mag delete karun takali...!!!

  ReplyDelete
 32. hmmmm मलाही आवडतोच बुवा हा पाउस. अगदी त्या २६ जुलै २००५ ला संध्याकाळी ४ वाजल्यापासून दुसऱ्या दिवासाचे दुपारचे १२ वाजेपर्यंत रस्त्यावरच काढायला लागले, तरी देखील त्यात त्याची चुकी काहीच नसल्यामुळे आवडतोच हा मला! :)

  ReplyDelete
 33. आहा...असे पाउस प्रेम पाहिजे....
  Hats Off To You.... :-)

  ReplyDelete
 34. माझं पाऊसप्रेमपण conditional आहे. मी कुठे जात असताना पाऊस पडलेला आवडत नाही, पण घरी येताना पडलेला आवडतो. नवीन कपडे किंवा शूज घातले असताना पडलेला आवडत नाही, पण अनवाणी असताना पडलेला आवडतो. हां, एक मात्र आहे. दर आठवड्यात एकदा तरी मुसळधार पाऊस पडून ऑफिस बंद व्हायला हवं. पण अशी प्रार्थाना केली तर शिंचा नेहमी दडी मारून बसतो... ;-)

  ReplyDelete