Friday, April 16, 2010

नीळा थेंब.....

काल मी माझ्या आजी कड़े गेले होते, तेव्हा स्टेशन वर न मी एक दृश्य पाहिले...म्हटले तर खूप फालतू आणि म्हटले तर मन हेलावून टाकणारे...
एक रंगारी स्टेशन वरचे बाकडे की काहीतरी रंगवत होता, त्याच्या हातून दोन तीन थेंब उडाले होते... आणि त्या स्टेशन वरच काम करणारी एक कामगार स्त्री त्या थेम्बात बोट बुडवून स्वताच्या रापलेल्या, पोळून निघालेल्या पायांची नखे रंगवत होती.......त्याना सजवत होती.... !!!
एक स्त्री म्हणून सजन्याचा , सुंदर दिसण्याचा
हक्क त्यानाही आहेच की...माणूस म्हणून आनंदी राहण्याचा हक्क आहे...पण त्याना मात्र तो नाही मिळत....कुठल्या जन्मीच्या पापा मुळे माहित नाही पण मिळत नाही एवढे नक्की....!!!
पायाना nail paint लावले नाही म्हणून ''मरत'' नाही कोणी पण Right To Be Happy त्याना मिळत नाही एवढे नक्की...
खरेतर काल दिवस भराच्या मजा मस्तीत विसरून ही गेले होते हे सगळे पण आज मावशीने दिलेली Gifts कपाटात ठेवता ठेवता खालच्या Nail paints च्या बॉक्स वर नजर पडली..... त्यात ठेवलेली ती कित्तीतरी रंगांची Lakme , ELLE 18 ची Nail Paints आणि डोळ्या समोर पटकन चमकून गेला तिचे पाय सजवणारा तो निळ्सर थेंब .....!!!!!