Friday, February 5, 2010

गांधी घराण्याच्या चपला

नवीन पिढी - नवीन चपला - आणि लाळघोटे पणा करणारे आपले नव नवीन मंत्री....
आजच राहुल गांधीचे बूट उचलून आपले गृह राज्य मंत्री रमेश बागवे यांनी 'सुहाने कल की यांदे' जागवली...
ग्यानी झेलसिंह यांनी इंदिरा गांधींच्या चपला उचलण्याची तयारी दाखवली होती आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्रीयुत शंकर राव चव्हाण यांनी संजीव गांधींच्या चपला उचलल्या...
अरे काय ???? गांधी काय राजे आहेत का देशाचे??? कित्ती हा लाळ घोटे पणा..... इतकी गुलामी वृत्ती....का? कशासाठी? पदासाठी? स्वाभिमान, आत्म सन्मान सगळे विकून खाल्ले या लोकानी? आत्ता अजून एक करा....... ओंजल धरून उभे रहा त्यांच्या पुढे आणि म्हणाव थूंका याच्यात..... एवढे एकाच बाकी ठेवलय। तेही करतीलच म्हणा , सांगायची गरजच नाही त्याना .... लवकरच काना वर येइल अशी काही बातमी .............. लाज कशी वाटत नाही याना देव जाने....
संताप संताप होतोय जिवाचा...........
अत्यंत बेकार झालिये ही पोस्ट माहित्ये मला पण तिडीक गेली डोक्यात आणि लिहावसे वाटले म्हणून लिहिले.....
बाकी चूक भूल द्यावी घ्यावी

25 comments:

  1. अत्यंत संतापाने लिहिलेले पोस्ट्स कधीच बेकार होत नाहीत. चांगलं झालंय.. तुझा संताप जाणवतोय.
    आणि गम्मत माहित्ये का तो बागवे त्याच्या कृत्याचं समर्थन करतोय. म्हणे राहुल त्याचा आदर्श आहे.

    ReplyDelete
  2. @ Heramb dada - Wahh... chaan. changale chalalay..... Pan aadarsh asla mhanun kaay chapala uchalayachya? Dhanya aahet he lok.....

    ReplyDelete
  3. या लोकांना म्हणावं की त्यांच्या चपलांचे फोटो आता तुमच्या देवघरात ठेवा, आणि रोज पूजा करा त्यांची! खेटरांची पूजा! त्यापेक्षा यांचीच खेटरांनी पूजा बांधायला हवी!

    ReplyDelete
  4. @ Aaditya chandrashekhar - Kharech.... Totally agreed eith you...

    ReplyDelete
  5. it should be done by our CM since he is having heritage from his great father

    ReplyDelete
  6. काही नाही साला सगळे राजकारणी डावपेच..नको त्या गोष्टी करून वरीष्ठांची मर्जी मिळवणा हाच उद्देश..स्व:ताला भरत समजतो काय हा माणूस? असेल तर सोड म्हणा पद आणि जा त्याच्या घरी चपला सांभाळायला...

    ReplyDelete
  7. tu bhari ahes ha kay.... kharach :)
    good to see you blogging back..

    ReplyDelete
  8. Thank you Ruyam dada...... :D
    Nice to see your comment........

    ReplyDelete
  9. खूप छान पोस्ट आहे. अगदी मनातून आलेले... अशीच लिहीत रहा.

    ReplyDelete
  10. Thank you Pankaj dada.........
    I will definitely try!!!

    ReplyDelete
  11. पोस्ट बेकार वगैरे काही नाही झालंय...संताप योग्यच आहे...महामुर्ख आहेत हे सगळे...

    ReplyDelete
  12. Thanks.... Anand dada..!!!!
    Kharay.. Really Mahamoorkh aahet sagle.

    ReplyDelete
  13. aga chan aahe ki post...
    tujya wayachi itar mula aata sampalele college days, yenara V day etc etc yacha wichar kartana tula hya batamiwar lihawasa watala yabaddal abhinandan....

    ReplyDelete
  14. क्रांग्रेसची ही लाचार संस्कॄती मी जवळुन पाहिली आहे अनुभवली आहे.

    ReplyDelete
  15. @ Aparna Tai - Ohh...Thanx
    @ Harekrishnaji - Kashi Kaay ???

    ReplyDelete
  16. hmm Maithili, keval tujhaach navhe sagalyaa sujaan manasaanchaa santaap vykat kelaayas.. lihat rahaa.

    ReplyDelete
  17. YOUR POST IS GOOD,Expressing Frank OPINIONS needs a strong will-power. No one else but only young citizens like us can make change in politics of india. Buck UP MAITHILI.

    ReplyDelete
  18. आपल्या देशात केवळ नावापुरती लोकशाही आहे
    अन्यथा ज्यांच्या हाती सत्ता आहे तेच लोक खरे राज्यकर्ते आहेत. आणि त्यांच्या भोवती असे लाळघोटेपणा करणारी माणसे असल्यास अजुन काय होणार?

    ReplyDelete
  19. aaayla cool down maithili it happens in politics!

    ReplyDelete
  20. Nalini taai, Vishhhh, Sagar dada aani deep dada Thanks for ur comments....

    ReplyDelete
  21. he to hona hi tha...he thodya phar pharkane , vegalya paddhatine sarv pakshat hot asate...ya lalghotpanala hi mandali nishta mhan tat...karan yanche dev paisa aani satta asatat..bass aapan matdan kartana jagrut rahayache ...

    ReplyDelete
  22. त्याच उचललेल्या खेटरांनी या असल्या लोकांची पूजा बांधायला हवी.

    ReplyDelete