Friday, October 29, 2010

आपुल्याच बोली वरती कुणाची मालकी...???

खूप दिवसां पासून ह्या विषय वर लिहायचे मनात होते, पण राहूनच गेले... आळशी पणा मुळे... असो, तर
point is, हल्ली मराठी बोलणे किंवा मराठीचा बोलण्याचा आग्रह धरणे हा एखाद्या पक्षाचा, माणसाचा trade mark होउन गेलाय. बर्याचदा तुम्ही मराठीत बोलण्याचा आग्रह वैगरे केला तर..."ओहो राज ठाकरे influence हां..." किंवा... "मनसे झिंदाबाद" असाच काहीतरी ऐकायला मिळते. निदान मला तरी बर्याचदा असा अनुभव आलाय.
एकदा कॉलेज मधे दोन मराठी मुली एकमेकांशी हिंदीत बोलत असताना मी त्याना टोकले...तुम्ही दोघी मराठीच आहात न...मग एकमेकींशी हिंदीत का बोलताय, तर मला मिनिएचर राज ठरवण्यात आले.
क्लास मधे सुद्धा एकदा, एक teacher ने मला विचारले होते, " तू हमेशा मराठी में क्यों बोलती है...? राज ठाकरे की follower है क्या? "
मला खर्रेच कळत नाही मराठी बोलणे कुणाची मक्तेदारी आहे का...? मी मराठी आहे म्हणून मराठी बोलते...that's it... त्यात कुठल्या राजकीय पक्षाचा किंवा एखाद्या माणसाचा वारंवार उल्लेख करण्याची काय गरज? आणि माझ्याच राज्यात माझीच भाषा बोलण्याची सहज कृति इतकी noticeable ठरत असेल तर ही खर्रेच काळजीची गोष्ट आहे...!!!

14 comments:

  1. very true said.... mala sudha same anubhav yeto colg madhe..

    ReplyDelete
  2. एकदम बरोबर मैथिली. पटलं. खरंच काळजीची गोष्ट आहे, कारण ह्याचा दूरवर वाईट परिणाम होऊ शकतो. हे जे तुला कळलं ते आपल्या दूरदृष्टीशून्य पुढाऱ्यांना बापजन्मात कळंत नाही! आपलं दुर्दैव! दुसरं काय?

    ReplyDelete
  3. सहमत... मलापण मराठी असून हिंदी मध्ये बोलणाऱ्यांचा राग येतो...
    पण कितीही सांगितलं तरी ऐकत नाहीत...

    ReplyDelete
  4. maithili,
    hi sagli aaplya marathi lokanchich vikruti aahe.
    marathi asun aapla english kiva hindi bolnyawar bhar asto an jar kuni marathi bolnyacha prayatn karat asel tar tyala tumhi jase mhatle tase kahi tari mhanun lok mokale hothat.
    Yawar uttar kai asel tar aaplya saglyanna aapli asmita, aapli bhasha yawar tham rahne garjecheche aahe.
    Tumcha lekh awadla an tya magil talmal sahaj dhyanat yete.

    ReplyDelete
  5. खरय, दोन मराठी माणसे हिंदीतुन वगैरे बोलायला लागली की आधी राग येतो, मग कीव येते त्यांची, मराठीतच बोल, सगळ्यांना समजत आणि बोलता सुद्धा येत, उगाच पब्लिक issue करत...

    ReplyDelete
  6. असं कोणी म्हणालं की सांगायचं की "बाबांनो मराठी भाषेचं वय हजार वर्षांच्या वर आहे आणि राज ठाकरेचं वय जेमतेम ४०. त्यामुळे कोणावर कोणाचा प्रभाव आहे हे तुम्हीच ठरवा साधं सोपं गणित सोडवून.. आणि जे उत्तर येईल ना त्याचाच प्रभाव माझ्यावरही आहे." आणि एवढं म्हणून झाल्यावर विचारायचं की "कळलं नसेल तर तुमच्या हिंदी किंवा विंग्रजीत सांगू का पुन्हा एकदा?"

    ReplyDelete
  7. sahamat,,,maithili shi ani heram shi pan. same experience mala pan alet

    ReplyDelete
  8. माझं ऐक..
    पुढे कुणी असं काही म्हणालं ना की 'आवरा' म्हणत जा!
    तरीही नसतील ऐकत, तर रजनीकांत मराठी आहे म्हणावं! ;)

    ऑन अ सिरियस नोट! त्यांच्याकडे बघून मस्त स्मित देऊन पुन्हा मराठीत सुरू होत जा! आपोआप लाईनवर येतील!

    ReplyDelete
  9. हेरंब आणि बाबाच्या कमेंट बघून मीच स्वतःला 'आवरा 'करतो.. अजून काही बोलायची गरजच नाही आहे.... कैच्याकै प्रचंड भारी कमेंट्स... :)

    ReplyDelete
  10. कोणी असं काही म्हणालं ना, तर अगदी अस्खलित मराठीतून सुरुवात कर. म्हणजे ‘लिफ्ट’साठी ‘उद्वाहक’, ‘अँब्युलन्स’साठी ‘रुग्णवाहिनी’, ‘बॅट्समन’साठी ‘फलंदाज’ असे शब्द वापर. समोरच्याच्या तोंडाला फेस ये‍ईल. मीही नेहमी असंच करतो. समोरचा एकदम लाइनवर येतो! Believe me, it works... ;-)

    ReplyDelete
  11. प्रतिक्रिये साठी सगळ्यांचे खूप खूप आभार...!!! :-)

    ReplyDelete
  12. कोणी उर्दू बोलत असेल तरी राज ठाकरेंचा फॉलोवर आहे असं म्हणतात का ?
    कारण, हिंदी आणि इंग्रजी फलकांना विरोध करणारे मनसे एका आंदोलनात मात्र चक्क उर्दू फलक घेऊन निदर्शन करताना दिसत होती ! मान्य आहे, 'सर्व धर्म निरपेक्ष' पक्ष आहे तो पण भाषेच्या बाबतीत मराठीलाच प्राधान्य आहे ना ? मग ?
    म्हणून कोणी विचारलं की राज ठाकरेंची फॉलोवर आहेस का तर सांगायला हरकत नाही की 'मी उर्दू भाषा बोलत नाहीय!"

    ReplyDelete
  13. khup khara ahe..ithe sydneyla tarmartahi loka muddam marathi bolat nahit.Mala kalat nahi tyana tyachi laj ka watate..

    ReplyDelete
  14. अगदी महत्वाचा आणि नेमकी मुद्दा मांडलात. मराठीत बोलत असताना मधेच तोडून कुणी हिंदी सुचवलं की मी 'चालायचंच' असं म्हणुन एक smile देतो आणि मराठी चालु ठेवतो.

    मध्यंतरी आम्ही ३-४ मराठी मित्र आमचे-आमचे मराठीत बोलत होतो. तेवढ्यात एक अमराठी मुलगा आला आणि काहीही संबंध नसताना 'अरे भई हिंदी में तो बोल ना, हमें कैसे समझ आयेगा' असं काहीतरी बरळला. मी त्याला एक look दिला आणि, 'समर्थाचीया सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे?' असं मोठ्याने बोललो. तो जोरोत दचकला आणि क्षणार्धात काहीही न बोलता निघून गेला.

    तुमचा लेख आवडला.

    ReplyDelete