Thursday, September 27, 2012

मल्हार

बरसताना तो एक सारखाच बरसतो....सगळ्यांवर...
पण प्रत्येकाचे perceptions आणि interpretations वेगळे.
.
राग एक असला तरी सुरांची धाटणी  वेगळी.
.
कोणा कवी साठी तो प्रेरणा होऊन येतो
तर कोणा long distance relationship वाल्या  यक्षांसाठी आठवणीचा दूत बनून येतो
कोणा went into "in a relationship" to "single" वाल्या लोकांसाठी तो वेदनेची बंदिश गातो
कोणा Dreamy single लोकांसाठी तो ओलीचिंब स्वप्न घेऊन येतो.
.
कोणा तानसेन चा  तो मियां कि मल्हार असतो
तर कोणा मीराबाई साठी  प्रेमाचा  मीराबाई कि मल्हार
.
कोणा खवय्या साठी तो खाण्याचे बहाणे घेऊन येतो
कोणा चित्रकारा साठी तो कल्पनेचे रंग  घेऊन येतो
.
कोणा, पाउसवेड्या साठी तो त्याच्या वर प्रेम करण्याची नवनवीन कारणे घेऊन येतो
तर कोणाला देतो दाटलेल्या मेघांतून symbolic depression.
.

कधी तो असतो...चारजू जी कि  मल्हार ...कधी छाया...तर कधी जयंत मल्हार...
कधी सुरदासी ...धुलिया ... तर कधी गौड मल्हार 
.

कोणा छोट्याशा पिल्लांसाठी तो डबक्यात उडी मारून पाणी उडवायचा खेळ घेऊन येतो
कोणा आजी साठी तो, पावसासाठी  दिवा ठेवायच्या  गोड जुन्या  रीतींचा सोहळा घेऊन येतो
.
कोणा corporate वाल्या काकांसाठी तो office च्या काचेवरची थेंबांची नक्षी होऊन येतो
कोणा trekker साठी तो सह्याद्रीची हाक घेऊन येतो
.
कधी तो अडसर बनतो एकमेकांना भेटण्यातला...
तर कधी स्वत:च शाई होऊन...कोणाची तरी Love Story लिहितो
.
कोणा Maithili Thinks वाल्या आळशी मैथिली ला post लिहिण्याचा उत्साह घेऊन येतो.
 कधी शब्दच घेऊन जातो कोणाचे...
तर कधी घेऊन येतो सुंदरसे सूर...
.
जैसो...जिसको नजरिया...जैसो जिसको नूर
वैसे उसपे बरसे...
"मल्हार के सूर"!!!



18 comments:

  1. व्वा... काय लिहिलंय. मस्त एकदम.
    अवांतर: मैथिली एकदम मोठी झाल्यासारखी वाटते आहे :-)

    ReplyDelete
  2. waah !! zabardast lihile ahe..sunder!! avadle !

    ReplyDelete
  3. चला... आता हे सगळे मल्हार एकदा कानावरून घालावेच लागणार... :)

    एखादा कधी व्हायोलिन (हो ना?) वर वाजवून ऐकव कधी.

    ReplyDelete
  4. आहा... झिमझिमता पाऊस.. :)

    ReplyDelete
  5. मस्त!
    कधी तो शिवारासाठी हिरवं स्वप्न बनून येतो! :)
    >> अवांतर: मैथिली एकदम मोठी झाल्यासारखी वाटते आहे :-) + १

    ReplyDelete
  6. मस्त...लय भारी लिहलय :) :)

    >> अवांतर: मैथिली एकदम मोठी झाल्यासारखी वाटते आहे :-) + १00000 ;)

    ReplyDelete
  7. वाह सुंदर गं बच्चू.... मस्त वाटतंय हे वाचून :) :)

    ReplyDelete
  8. सगळ्यांना खूप खूप Thnks :-)

    ReplyDelete
  9. मल्हार गायला कि म्हणे पाउस येतो... well... it worked here too :P
    मी जेव्हा हि पोस्ट पब्लिश करत होते तेव्हा वाटत होते... पावसाळा संपल्या नंतर कसला मल्हार आणि कसले काय...
    पण परत एन्ट्री घेतली त्यानी... हि पोस्ट पब्लिश केल्यावर...
    May be he's proving tht he loves me back ;-)

    ReplyDelete
  10. आणि हो... मोठी वैगरे नाही झालीये मी :D
    (लहान राहायलाच आवडतं मला... It's good n beneficial too :P )

    ReplyDelete
  11. For free download of Maithili Films, Maithili Movies

    ReplyDelete
  12. for latest Maithili movies do visit this site. MAITHILI MOVIES

    ReplyDelete
  13. वा! अप्रतिम. तुमच्या लेखनाची शैली अफलातून आहे.

    ReplyDelete