Saturday, November 20, 2010

कविता ;-)

एक मित्राला काही कारणास्तव एक कविता लिहून हवी होती, नविन नविन प्रेमात पडलेल्या मुलाच्या point of view मधून काहीतरी लिहून हवे होते त्याला...
तेव्हा हे लिहून दिले होते....बर्रेच दिवस झाले ब्लॉग वर काही लिहिले नाही म्हणून आणि आज काल buzz वर सगळ्याना कवितेचा कीड़ा चावला आहे, तेव्हा म्हटले मी ही ब्लॉग वर एकदा पद्य publish करून बघते... so, here it is... :-)
कसे सांगू मित्रा
काय वाटतय मला
पहिल्यांदाच तिला बघितल्यावर हा पोरगा बरबाद झाला
खाणे, पिणे झोपणे सगळाच वांदा झाला
प्रेमात पडलो यारा...मी प्रेमात पडलो यारा...

डोळ्याच्या कोपर्यातुन हळूच बघणे
गालाला खळी पाडून गोड गोड हसणे
नजरेसमोरून माझ्या काही केल्या जात नाही
तिच्या शिवाय दिवस माझा उगवत नाही , मावळत नाही
तिच्याशी एकदा बोलायला जीव वेडा झाला
प्रेमात पडलो यारा...मी प्रेमात पडलो

नविन वाटे जग सारे, नविन सागर, नवा कीनारा
नविन चन्द्र नविन तारा
नविन पाउस नवा वारा
च्यायला आज काल कवितेच्या ओळी ही लागल्या सुचायला
प्रेमात पडलो यारा...मी प्रेमात पडलो यारा...

कट्ट्यावर आजकल जीव कसाबसा रमवतो
शिवी देताना ती बाजूला नसल्याची खात्री करून घेतो
वेळेवर जातो कॉलेजला, सगळी lectures attend करतो
बस,, मी सभ्य मुलगा आहे याच्या वर विश्वास तिचा बसावा
कारण मी प्रेमात पडलो यारा...मी प्रेमात पडलो यारा...!!! :-)


22 comments:

 1. सहज आणि मस्त जमली आहे.... :)

  ReplyDelete
 2. कविता तर छानच आहे. मस्त जमली आहे. बाय द वे, आजकाल हे ‘नवीन प्रेम’ तुझ्या ब्लॉगवर वारंवार यायला लागलं आहे. क्य पक रहा है?? अं.. अं.. ;-)

  ReplyDelete
 3. मामला काय आहे सारा
  कोण प्रेमात पडलाय यारा? :)

  ReplyDelete
 4. Thank you देवेन दादा....आपल्या buzz च्या प्रेरणेने च तर publish केलिए ना post...!!! :-)

  ReplyDelete
 5. प्रसाद दादा, काही मामला नाहीये....मी वरती स्पष्ट केलय सगळे....:P :P :P

  ReplyDelete
 6. संकेत दादा, Thank you sooo much....
  आणि बाकि असे काहीही खास नाहीये रे....खर्रेच....!!!

  ReplyDelete
 7. मस्त जमतेय पाडापाडी!!

  ReplyDelete
 8. मैथिली, छान छान! अगदी तू त्याच्या 'शू' मध्ये शिरलीयस की गं!

  ReplyDelete
 9. हेहेहे!! मस्त पाडलीये कविता!! छान जमतेय !!अशीच मित्रांची मदत करत रहा...

  ReplyDelete
 10. एकदा तरी प्रेमात पडावेच...कॉलेज मध्ये असताना जे प्रेमात पडत नाहीत( निदान प्रेमात पडावेसेही ज्यांना वाटत नाही) ते कॉलेज लाइफ फुकट घालवतात ( अभ्यास करण्यात)!!

  ReplyDelete
 11. ओय अगदी रव्याच्या लाडवासारखी झालीय बरं !
  छान छान !
  मी तुला एक पाटवली होती ना तिच्या पॉईंट ऑफ व्ह्यु मधुन,
  " सटवी" कविता ! हे हे हे ती अजुन पुर्णच नाही झाली !!

  ReplyDelete
 12. Thank You विभि दादा...!!! :-)

  ReplyDelete
 13. अनघा ताई, हो खर्रेच... ;-) :-P :-D n ya...Thank you...

  ReplyDelete
 14. संकेत दादा, हेहे...हो नक्की नक्की...btw, thank you... :-)

  ReplyDelete
 15. सागर दादा, ह्ह्म्म...खरय खरय... :-) :D ;) :P

  ReplyDelete
 16. दीपक दादा, Thank you Thank you.... :-)
  अरे...काय हे...तू अजून पूर्ण नाही केलीस ती कविता... Gr888...!!! :-)

  ReplyDelete
 17. खूप छान...कॉलेजचे दिवस आठवले.
  गुड वन

  ReplyDelete
 18. क्या बात है!!!धमाल लिहिली आहेस ग! सहीच!

  ReplyDelete
 19. This comment has been removed by the author.

  ReplyDelete
 20. छानच लिहिली आहेस

  ReplyDelete