Friday, April 8, 2011

सुट्टी

सुट्टी...सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा विषय. आणि आजकाल काहींच्या हेव्याचा पण... ;-)
तर...सुट्टीत एक सर्व साधारण प्रश्न सतत येऊन कानाला बोचत असतो. मग आत्ता काय करणार सुट्टीत? अर्रे... वर्षभर इतके डोकी फोडत असतो...तर सुट्टीत हि काहीतरी करायलाच हवे का? शांत निवांत बसूच नये कि काय माणसाने?
( अर्थात हे माझ्या सारख्या महा आळशी लोकांचे मनोगत आहे तेव्हा समजून घ्या...) पण एकूणच मुलांनी सतत गुंतून पडावे
असे का वाटते राव सगळ्यांना?
हे शिबीर ते courses...एक न हजार गोष्टी. सुट्टीत मज्जा करण्याची concept नाहीच उरलीये बहुदा आत्ता.
( बहुतेकदा मुलांचा हट्ट असतो वैगरे सगळे ठीके...मी पण केलीयेत बर्रीच नाटके सुट्टीत.) पण Forcefully, केवळ मुले अडकून रहावीत ह्या उद्देशाने आई बाबा इकडे तिकडे नवे नोंदवतात ना मुलांची ते नाही आवडत मला...
कधी कधी तर ह्याचा मुलगा हे करतोय आणि त्याची मुलगी ते करतेय म्हणून आई बाबा मुलांना पिटाळतात सगळीकडे ते तर भार्रीच
irritating असते.
आजू बाजूची लहान मुले खरेतर इतर वेळी जास्त मजा करत असतात, असे general observation आहे माझे.
सुट्टी आई बाबांच्या म्हणण्या प्रमाणे च घालवली जाते शक्यतो...
माझ्या मते...सुट्टी झोपायला, खेळायला, काही न करता आळशी पणे बसून राहायला, TV वर उग्गाच काहीही nonsense बघायला, तासान तास फोन वर बोलायला आणि आई बाबांना न आवडणार्या अनेक गोष्टी करून वर "...मग सुट्टी सुरु आहे न माझी" असे ऐकवायला असते.
त्यामुळे मी तरी "काहीही" न करता छान हात पाय पसरून आराम करतेय सुट्टीत...उन्हाळ्याची सुट्टी ह्या साठीच तर असते न...what say? ;-)

13 comments:

 1. तर..तर...पुढच्या महिन्यात माझी ही सुट्टी सुरु होईल...मग अजून बरेच लिहायचे आहे
  मी तर कधी काही कोर्स वगैरे केले नाही...सुट्टीला मस्त गावी जायचे नाहीतर क्रिकेट खेळायचे आणि अजून काय काय उद्योग...
  आणि आज आपण दोघा आळशी लोकांनी एकाच दिवशी पोस्ट टाकली...वाह वाह !

  ReplyDelete
 2. अगदी perfect आहे तुमचं मैथिली! सुट्टीतही वेळापत्रक मागे लावणार्‍यांचा मी इथे जाहीर निषेध करतोय!

  ReplyDelete
 3. मैथिली, काय बरं करणार आहेस तू ह्या सुट्टीत?! :p :)

  ReplyDelete
 4. सुट्टी यन्जॉय करणार्‍या लोकांचा णि..षे...ध... (हे सहजच बर)
  पण खरच सुट्टीची मजा काही औरच....आता काम अन जबाबादार्‍या यात सुट्टीमधील मजा हरवली आहे.

  जाउ दे तु सुट्टी मध्ये मस्त धमाल कर...बोले तो टेन्शन लेने का नही.. :) :)

  ReplyDelete
 5. बेस्ट.. असंच हवं...
  आराम कर बच्चू.. :)

  ReplyDelete
 6. मज्जानी लाईफ ... एन्जॉय :)

  ReplyDelete
 7. "...मग सुट्टी सुरु आहे न माझी"

  मला हवे ते करेन ...
  हाच attitude पाहिजे सगळ्या पोरांचा ..

  ReplyDelete
 8. एकदम पटलं :)
  मी हि माझी सुट्टी अशी च काहीही plan न करता enjoy करतीय :)

  ReplyDelete
 9. झाली का कॉलेजची तयारी सुरु?? सुटी संपत आली असेल नाही आता??

  ReplyDelete
 10. YO अपूर्वा ताई,
  Njy Ur Vacation to d fullest... :-))

  ReplyDelete
 11. महेंद्र काका...
  हम्म...झाले सुरु कॉलेज :-)
  सुट्टी संपली... :(

  ReplyDelete