नीट वाजतच नव्हते violin. Positions बरोबर होत्या....bow हि perfect होता पण बिनसले होते काहीतरी...
हवे तसे सूर उमटतच नव्हते...
.
.
खूप दिवसांनी लिहितेय ब्लॉग वर. हे काही नवीन नाही म्हणा, पण ह्या वेळी आळशीपणा एवढेच कारण नव्हते. काही सुचत नव्हते असेही नाही...
लिहायला सुरुवात हि केली बरेचदा...पण दोन चार शब्द लिहून झाल्यावर, लिहावसे वाटेच ना...
.
.
खूप काही try केले...तारा पुसून घेतल्या...bow चे tension कमी जास्त करून पाहिले...पण काही केल्या सूर नाही सापडले.
.
.
खूप पसारा झाला होता आतल्या आत. अस्ताव्यस्त पडले होते सगळे विचार...एक मेकात अडकून गुंता झाला होता सगळ्याचा.
काही बोलायला गेले कि भांडण च व्हायचे...माझ्या सगळ्या बोलण्याचा उलटा अर्थ च निघत होता.
.
.
एवढे सगळे केल्या नंतर मात्र violin पेटीत ठेऊन दिले. नाहीच वाजवायचे मला...हड्ड...गेले उडत...
.
.
गप्प च बसणारे आत्ता. कोणाशी काही बोलायचेच नाही मुळी मला.
.
.
पण कित्ती दिवस बंद ठेवणार ना...violin...पेटीत. कसे तरीच व्हायला लागले. वाजवत राहिल्या शिवाय कसे कळणार कुठे काय बिनसतंय ते...?
.
.
बोलायला हवे... मनातला कचरा काढून टाकल्या शिवाय नव्या साठी जागाच नै उरणार...ज्याच्या वर राग होता त्याला तसे स्पष्ट सांगून टाकले.
हे जे काही तू वागला आहेस...ते नाही आवडलेय मला. उग्गाच गोड गोड राहण्या साठी खोटे बोलून काय फायदा...?
ना धड चांगले वागता येत...आणि ना धड शिव्या घालता येत. आणि मग असा त्रास होत राहतो.
.
.
situation कोणतीही, कशीही असली तरी, पळून जाण्याने काहीच सध्या होत नाही...हे कळतेय हळू हळू...
बोलायला हवेच...घुसमट वाढवण्या पेक्षा बोलून मोकळे झालेलं बरे,
.
.
Tuning केलेय आत्ता...सूर हि सापडतायत...छानसे काही वाजेल बहुदा आत्ता. आणि काही झाले तरी...आत्ता पेटीत नै बंद करायचे...हेही ठरलेय माझे. :-)
chhan.............
ReplyDeleteखूप छान वाजतंय!!! ऐकू शकतेय मी! :)
ReplyDeleteझालंय की tune :)
ReplyDeleteलिहित राहिलीस तर चांगलंच लिहिशील..
ReplyDeleteबऱ्याच दिवसांनी वायोलिन हातात घेतली म्हणून काय वाईट वाजणार नाही ती...
छान झालीये!
मस्तच मैथिली.. लिखाणाचा फॉर्म खूप आवडला.
ReplyDeleteआणि त्याचबरोबर पाडगावकरांची ही अप्रतिम कविताही आठवली.
दार उघड
दार उघड चिऊताई
चिऊताई दार उघड !
दार असं लावून,
जगावरती कावून,
किती वेळ डोळे मिटून आत बसशील?
आपलं मन आपणच खात बसशील ?
वारा आत यायलाच हवा!
मोकळा श्वास घ्यायलाच हवा !
दार उघड,
दार उघड,
चिऊताई चिऊताई, दार उघड !
फुलं जशी असतात,
तसे काटेही असतात.
सरळ मार्ग असतो,
तसे फाटेही असतात !
गाणा-या मैना असतात.
पांढरे शुभ्र बगळे असतात.
कधी कधी कर्कश्य काळे
कावळेच फ़क्त सगळे असतात .
कावळ्याचे डावपेच पक्के असतील.
त्याचे तुझ्या घरट्याला धक्के बसतील .
तरीसुद्धा या जगात वावरावंच लागतं.
आपलं मन आपल्यालाच सावरावं लागतं .
दार उघड
दार उघड चिऊताई,
चिऊताई दार उघड !
सगळंच कसं होणार
आपल्या मनासारखं?
आपलं सुद्धा आपल्याला
होत असतं परकं !
मोर धुंद नाचतो म्हणून
आपण का सुन्न व्हायचं?
कोकीळ सुंदर गातो म्हणून
आपण का खिन्न व्हायचं ?
तुलना करित बसायचं नसतं गं
प्रत्येकाचं वेगळेपण असतं गं !
प्रत्येकाच्या आत
फुलणारं फूल असतं.
प्रत्येकाच्या आत
खेळणारं मूल असतं !
फुलणा-या फुलासाठी,
खेळणा-या मुलासाठी ,
दार उघड
दार उघड चिऊताई
चिऊताई दार उघड !
निराशेच्या पोकळीमध्ये
काहीसुद्धा घडत नाही.
आपलं दार बंद म्हणून
कुणाचंच अडत नाही !
आपणच आपला मग
द्वेष करू लागतो
आपल्याच अंधाराने
आपलं मन भरू लागतो
पहाटेच्या रंगात तुझं घरटं न्हालं.
तुला शोधित फुलपाखरु नाचत आलं .
चिऊताई चिऊताई
तुला काहीच कळलं नाही .
तुझं दार बंद होतं.
डोळे असून अंध होतं .
बंद घरात बसून कसं चालेल?
जगावरती रुसून कसं चालेल ?
दार उघड
दार उघड चिऊताई
चिऊताई दार उघड !
वैभव दादा... Thanks... :-)
ReplyDeleteमनाली ताई...
ReplyDeleteहे हे.. Thank you ग... :-))
बंड्या दादा...
ReplyDeleteहम्म... मलाही वाटतंय असंच... :-)
Btw...Thanks...
Thanks सागर दादा... :-)
ReplyDeleteहेरंब दादा...कसली भार्री कविता आहे रे...
ReplyDeleteThank you so much for this...
मला जे जे काही वाटत होते ना...तेव्हा...त्या सगळ्याचे उत्तर मिळाले मला ह्या कवितेत... :-))
मैथिली...जबरदस्त लिहल आहेस...खुप आवडल..मस्तच
ReplyDeleteएकदम छान गं.. सुंदर प्रकारे मांडलंयस! :)
ReplyDeleteमैथिली ,Tuning मस्तच झालय, आता वेगवेगळे सूर बाहेर येऊ देत....
ReplyDeleteमैथे, जबरी लिहिलं आहेस.. आवडेश!
ReplyDeleteवाह !! खूप सु,न्दर मैथिली !
ReplyDeleteखूप्च छानपणे मांडलयं सारं !!+++++
बच्चु, तुझ्याचं ब्लॉगवर तुझं स्वागत खुप दिवसांनी..मस्त लिहिलंयसं :)
ReplyDeleteतुला एक टास्क दिलं आहे मी व्हायोलिनसाठी. लक्षात आहे नं? :) :)
छान लिहीलयस. प्रांजळपणे सगळं...
ReplyDeleteरच्याक,
तू खरंच व्हायोलिन वाजवतेस?
वेगळीच लिखाणाची शैली पाहिली. छान वाटली! बाकी, मस्तच लिहिलय. संपुर्ण ब्लॉगही "भारी"!
ReplyDeleteआम्ही कुठे उलथलो होतो व्हायोलिन वाजत नव्हते तेव्हा? एकदा पिंग करायचं हों फक्त.
ReplyDeleteअसो आता मस्त गाणं होऊन जाऊ दे.
मस्त झालाय लेख. आवडला.
ReplyDeleteखूप छान लिहिलंय. :)
ReplyDeleteमस्त लिहिलं आहेस.
ReplyDeleteवा!सुंदर लेखन,मैथिली अग मनात गोष्टी ठेवून घुसमट वाढते हे खरे, बोलून टाकले कि विचार मोकळे आणि मन शांत. violin छानच वाजते बघ...
ReplyDeleteमग गुंता सुटला का आणि आता स्वर सापडले का तुला?
तुझं पोस्ट उपमा अलंकाराचा छान वापर केला आहेस..:)एकदम पसंत!
मनमौजी दादा आणि विभि दादा...
ReplyDeleteThanks... :-)))
देवेन दादा...
ReplyDeleteLets hope so... :-)
N ya...Thnx
आनंद दादा...दीपक दादा...
ReplyDelete:-) :-) :-)
धन्यवाद... :-)
सुहास दादा...
ReplyDeleteThanks...आणि हो I ll try my level best for tht...M waiting for tht day to come... :-))
आल्हाद...
ReplyDeleteThanks re...आणि हो मी violin वाजवायला शिकत्येय... :-)
@अद्वैत कुलकर्णी
ReplyDeleteधन्यवाद... :-)
पंकज दादा...अरे...Violin वाजत नव्हते फक्त...बिघडले नव्हते...
ReplyDeleteअसे झालेच तर अगदी हक्काने येईन तुमच्या कडे...:-))
छळायला ;-)
सिद्धार्थ दादा, अनघा ताई, महेंद्र काका...
ReplyDeleteTHANKS :-)
श्रिया ताई...
ReplyDeleteThank you :-)
मैथिली! खूपच आवडलं! मस्तच!:)
ReplyDeleteएक नंबर लिहिलेयस मैथिली... आवडले भारीच..
ReplyDeleteचांगलं वाजतंय की व्हायोलिन. आता वाजव नित्यनियमाने. ऐकायला आवडेल आम्हाला. :-)
ReplyDeleteजबरदस्त सकारत्मक लिखाण!!!
ReplyDeleteहेरंबने पोस्ट केलेली कविता तर केक वरचं आयसिंगचं!
इतक्याश्या वयात इतका प्रौढपणा कसा येतो तुमच्यात, मला तर नवलंच वाटतं.
लय भारी.....
ReplyDeleteThe more different are among them, in my point of view, Very well written and certainly a pleasure to get into a blog
ReplyDeleteIndia is a land of many festivals, known global for its traditions, rituals, fairs and festivals. A few snaps dont belong to India, there's much more to India than this...!!!.
visit here for India
Nice info !
ReplyDeleteEven I have Blog site "sellonlinewithus.com" where you can write your any business related blogs.
Benefit of writing: Daily 5000 customers or people visit my blog site and they also happened to read your article, such a good reach I have, I do lot of advance digital marketing daily to increase people's visits.
So if you have any kind of business and want an instant reach then this can be the solution
Thanks,
Jitendra Deshpande, Pune
Owner: sellonlinewithus.com
This comment has been removed by the author.
ReplyDeleteEk number lay bhari Mustach
ReplyDeleteMarathi Shubecha