Friday, February 6, 2015

छोटी छोटी सी बात

Collection inspired from Terribly Tiny Tales... :-)

They both told each other...It was just the situation...
But their first kiss never ended up being the last one...
.
.
Now they know it's never JUST the situation!!!

--- --- --- --- --- --- --- --- ---

She went to the city and started smoking all of a sudden
Everybody said ' बडे शहर की हवा लग  गई'
only she knew k वो उसके shirt की smell को कितना miss करती थी
--- --- --- --- --- --- --- --- --- 

They shared chai...sandwiches...notes...stationary...bench...gossips...everything.
Feelings remained withheld
.
.
Now they share memories of what they shared
and try to let out the unshared...through their sighs...
--- --- --- --- --- --- --- --- ---

We have nothing in common...He told her
Her tears spared a smile...later...when...
He just couldn't decide to whom that blue shirt originally belonged...
--- --- --- --- --- --- --- --- --- ---
तिला बाहेर जाऊन भिजायचा होत…चिंब 
'भिजायचं बिजायच असेल तर मागून चालत ये…गाडी  नाही खराब करायची' तो कटकटला 
तिची आवडती पावसाची गाणी लावत…
--------------------------------------------------------------------



Thursday, September 27, 2012

मल्हार

बरसताना तो एक सारखाच बरसतो....सगळ्यांवर...
पण प्रत्येकाचे perceptions आणि interpretations वेगळे.
.
राग एक असला तरी सुरांची धाटणी  वेगळी.
.
कोणा कवी साठी तो प्रेरणा होऊन येतो
तर कोणा long distance relationship वाल्या  यक्षांसाठी आठवणीचा दूत बनून येतो
कोणा went into "in a relationship" to "single" वाल्या लोकांसाठी तो वेदनेची बंदिश गातो
कोणा Dreamy single लोकांसाठी तो ओलीचिंब स्वप्न घेऊन येतो.
.
कोणा तानसेन चा  तो मियां कि मल्हार असतो
तर कोणा मीराबाई साठी  प्रेमाचा  मीराबाई कि मल्हार
.
कोणा खवय्या साठी तो खाण्याचे बहाणे घेऊन येतो
कोणा चित्रकारा साठी तो कल्पनेचे रंग  घेऊन येतो
.
कोणा, पाउसवेड्या साठी तो त्याच्या वर प्रेम करण्याची नवनवीन कारणे घेऊन येतो
तर कोणाला देतो दाटलेल्या मेघांतून symbolic depression.
.

कधी तो असतो...चारजू जी कि  मल्हार ...कधी छाया...तर कधी जयंत मल्हार...
कधी सुरदासी ...धुलिया ... तर कधी गौड मल्हार 
.

कोणा छोट्याशा पिल्लांसाठी तो डबक्यात उडी मारून पाणी उडवायचा खेळ घेऊन येतो
कोणा आजी साठी तो, पावसासाठी  दिवा ठेवायच्या  गोड जुन्या  रीतींचा सोहळा घेऊन येतो
.
कोणा corporate वाल्या काकांसाठी तो office च्या काचेवरची थेंबांची नक्षी होऊन येतो
कोणा trekker साठी तो सह्याद्रीची हाक घेऊन येतो
.
कधी तो अडसर बनतो एकमेकांना भेटण्यातला...
तर कधी स्वत:च शाई होऊन...कोणाची तरी Love Story लिहितो
.
कोणा Maithili Thinks वाल्या आळशी मैथिली ला post लिहिण्याचा उत्साह घेऊन येतो.
 कधी शब्दच घेऊन जातो कोणाचे...
तर कधी घेऊन येतो सुंदरसे सूर...
.
जैसो...जिसको नजरिया...जैसो जिसको नूर
वैसे उसपे बरसे...
"मल्हार के सूर"!!!



Saturday, September 8, 2012

Relationships, इगो आणि इमरोज

"Hey...dude...wts up..."
"Nothing..."
"काय झाले, your mood doesn't seem good...भांडलास का तिच्याशी?"
"Nah... भांडायला तरी वेळ कुठेय हल्ली तिच्याकडे"
"मुला सरळ शिस्तीत सांग काय झालेय ते "
"nothing यार...she has become so busy these days... now she's GS n all na of college ...सतत काही न काही कामात असतेच ती..."
"Is this really about she's being busy or about she's being GS?
busy ती आधीही असायची. ती पहिल्या पासूनच active आहे. आणि तुही असायचास च कि ह्या सगळ्यात.
आत्ता बदललेय ते फक्त इतकेच कि आत्ता...she has post...She's famous. Everybody is asking for her..."
"मी जळतो तिच्यावर असे म्हणायचेय तुला...or you wanna say that I have male ego n all कि मी माझ्या GF ला famous झालेले बघू शकत नाही?"
"chill dude...chill... I am not saying any of this...It happens..."
------------------------------------------------------------------------------------------------------------

"मग आवडतो ना तुला तो...?"
"कोणी सांगितले तुला...All crap it is..."
" Ok...come on  now girl...तुझ्या बद्दल काही कळायला मला कोणाच्या काही  बोलण्याची गरज नाहीये...तुझ्या सुद्धा...ok?"
" अर्रे यार... खर्रेच नाही...I just hate him..."
"....."
"Dnt give me looks..."
"....."
"आणि तसेही काय फरक पडतो..."
"का...?"
"Like you dnt know only... He is a Chair person of that big...giant...Festival...रोज कुठल्या ना कुठल्या पेपर मध्ये photo येतात त्याचे. News channels are taking his interviews n all... कॉलेज मध्ये तर everybody is like chanting his name."
"मग problem काय आहे तुला...Ulta you should be happy na..."
"Nothing... I just... you know...dnt want to be in relationship...where... everybody will consider me as a LUCKY ONE...
म्हणजे मला सतत येत जाता हे नाही ऐकायाचेय कि ohh... she's soo lucky...she's with him.
किंवा 'but n obvious तिनेच पटवलेय त्याला...' 
You know something like that... म्हणजे तो माझा असल्याचा अभिमान वैगरे ठीक आहे पण सतत I dnt want to feel like he's some Prince on white horse...n I am some poor little comman girl...
हे ऐकायला खूप आगाऊ वाटेल हि...पण उगाच वेड  पांघरून पेडगावला जाण्यात काय अर्थ आहे, खरे ते खरे...
I cant take this. इगो म्हणा किंवा अजून काही... पण after a certain limit... everybody thinks so..."
------------------------------------------------------------------------------------------------------------
एक जुना  photo सापडला आज मला... documents मध्ये... Amrita Imroj ( Uma Trilok) या पुस्तकातला एक para click केला होता...
खूप आवडला होता मला...
"कोणीतरी इमरोज ना विचारले...'लोग केहते ही आपने आपकी सारी जिंदगी अम्रिता को पंखा करते हि गुजर दि... त्यावर त्यांचे उत्तर होते...'वो कहा जानते ही...उसे पंखा करते करते हवा मुझे भी तो आयी..."
------------------------------------------------------------------------------------------------------------
किती छान उत्तर आहे हे...कसे जमत असेल स्वताचा इगो...attitude...असा बाजूला ठेवून... आपल्या पार्टनर च मोठेपण इतक्या सहज स्वीकारायला...बाहेरच्या जगात तो/ती ह्याच्याशीच आपली ओळख जोडली गेलीये...हे पचवणे कठीण नसेल जात...?
------------------------------------------------------------------------------------------------------------
EGO is the only thing...that washes away your all dreams and happiness...कुठे तरी वाचले होते अलीकडे ...
खरे असावे...इगो सोडल्या शिवाय TRUE LOVE n all सापडत नसावे... :-)
------------------------------------------------------------------------------------------------------------
मोठे व्हावे लागेल... दुसर्याचे मोठेपण स्वीकारावे लागेल...happily...तरच माझी स्टोरी पण
"And they lived happily ever after.."ने संपेल. :-)
------------------------------------------------------------------------------------------------------------
कळतेय हळू हळू...वळायला थोडासा वेळ तरी लागेल... :-) 





Monday, April 30, 2012

ट्रेन, IV, Friends आणि Drama


काही गोष्टी कळूनही वळत नसतात. मग अशा छोट्या गोष्टी कळायला मोठा Drama व्हावा लागतो. तसेच काहीसे झाले माझ्या IV च्या वेळी.  : D

They all were good as friends...पण त्यांना ती special place नव्हते देऊ शकत मी. My college friends. एक अंतर ठेऊन वागत होते आणि त्यांनी कधी ते अंतर पार केले तर मग चिडचिड व्हायची माझी. "hey you ppl are nt my best frnds... So plzz...dnt try to b" असे बर्रेच काहीसे असायचे मनात.

त्याच वेळी IV ची announcement झाली. जायचे होते हे तर नक्की...त्या मुळे थोडे दिवस करू adjust असे ठरवले होते.

जायचा दिवस उजाडला. ३.४५ ची जयपूर super fast होती...बांद्रा terminus हून. आणि नेमके त्या दिवशी driver काकांना उशीर झाला आणि मला घरून निघायलाच २ वाजले.
आणि Sion-Bandra  link road वर असा वाईट traffic jam होता कि ३.३० झाले तरी मी तिथेच. शेवटी मध्ये उतरून मी आणि काकाने धावत जायचे ठरवले. मोठ्ठी bag खांद्यावर घेऊन मी वेड्या सारखी पळत होते. plus Bandra ला बर्रीच तोडफोड केली होती रस्त्यावर तेव्हा...त्यातून वाट काढत...खड्ड्यांवरून उड्या मारत मी धावत होते, वरून तिथून सगळ्यांचे calls...कुठे आहेस...? कुठ पर्यंत आलीस ? वैगरे. अर्ध्या रस्त्यावर असताना friends चा call आला.
"अबे किधर है तू? काही पे भी चढ जा फिलहाल..."
" I can't. मी अजून पोहोचलेच नाहीये."
" @#$% ट्रेन left. :-| "

I was screwed. कित्ती plans केले होते. I wanna go...मला जायचय काहीही करून...इतकेच काळात होते मला.

त्यात धावताना काका चा पाय मुरगळला. तो पर्यंत बाबा आले होते आम्ही जिथे होतो तिथे.( ते direct Bandra terminus पोहोचले होते) मग गाडीतून call आला सरांचा,
"Next stop is Borivali. Try to reach there."
ट्रेन सुटली होती. almost impossible होते. Borivali हून ट्रेन पकडणे.

तरी मी आणि बाबाने try करायचे ठरवले. तिकीट काढले. विरार फास्ट पकडली. 

तिथून सगळ्यांचे calls सुरूच होते. 
" काही झाले नाहीये... अजून वेळ आहे. calm down. बोरीवली हून मिळणारे ट्रेन तुला. so...just chill."
"ok. अभी vileparle गया...तू कहा पे है?"
"तू call cut मत कर. बोरीवली पर्यंत पोहोचलीस कि मग च फोन ठेव."

मी ज्या ट्रेन मध्ये होते, तिथले काहीजण पण वाकून वैगरे बघत होते...माझी ट्रेन कुठ पर्यंत आहे. ( दिसत होती ती ट्रेन...अगदी थोड्याश्या distance ने आम्ही पुढे होतो.) आणि मला धीर देत होते... कि मिळेल ट्रेन तुला...घाबरू नकोस...n all... : p
जसे बोरीवली आले...तशी मी धावत सुटले...( एकदम Jab we met style... : D )
लोकांना धक्के वैगरे देऊन शेवटी एकदाची त्या platform वर पोहोचले आणि ट्रेन आली. :-)
दोन तीन मित्र खाली उतरले माझे समान घेतले आणि आमच्या डब्याकडे पळत सुटलो आम्ही.
आणि Finally ""मला ट्रेन मिळाली"" :-)))

मी आत शिरले आणि सगळे classmates wooohooo करून ओरडले. मला पाणी वैगरे दिले. 
आणि मग माझ्यावर ओरडले. : p
"काही अक्कल आहे तुला...कित्ती tension मध्ये होते सगळे. कोणीही बसले सुद्धा नव्हते तू येई पर्यंत. हमारे group के लोग छोड पर बाकी सब भी खडे थे इधर." 
"We decided k...we ll pull the chain...if u cdnt reach on time at Borivali. n then सब मिलके fine भरेंगे. we calculated amt too...how much each person ll pay..." ( thts sweet :-) )
" जान निकाली हमारी...@#$%^&*" 
"Heena  almost cried." ( OMG :-o rlly? )
" vidhi said k हम लोग भी उतर जाते है बोरीवली पे...वो चढी नही तो. ( They actly said it...I dnt kw whether  they meant that or not...but...इतके बोलणेही खूप आहे...I was touched. )"

खर्रेच शूट करून ठेवायला हवे होते ते सगळे. :-) 
नंतर मला व्यवस्थित बुकलण्यात वैगरे आले... सगळ्यांना tension दिले म्हणून. पण It was fun... :-)

नंतरचे दिवस कसे गेले...कळलही नाही...
I learned it... what I needed to...
अर्थात त्या साठी फार मोठ्ठा Drama घडला ;-)
पण...चलता है... कधीही विसरणार नाही मी हा filmy scene... : D
Life time memory आहे ती...माझ्या साठी आणि माझ्या friends साठी पण... ;-)

ट्रेन सुटली खर्री...पण पकडली तेव्हा अजूनही बर्रेच काही सापडले...नव्याने... :-) 



Tuesday, January 17, 2012

Thank you...

आज bdy आहे माझ्या ब्लॉग चा...
तुमच्या सगळ्यांच्या sweet sweet comments आणि support मुळे रडत खडत का होईना पण सुरु राहिला माझा ब्लॉग.
3 years...It was really nice journey...
छान छान दादा आणि ताया मिळाल्या... 'लहान blogger' म्हणून लाड झाले...
राग, वैताग सगळे share करायला मिळाले...कौतुक, motivation मिळाले...
ह्या ३ वर्षात... बंद करून टाकू आता ब्लॉग असे कित्ती तरी वेळा आल्र मनात...पण नाही करवले माझ्याच्याने असे...
"Maithili Thinks" bcm part of my life... :-) N so...all of u... :-)
THANKS....for reading my crap...Thanks for showing interest in it...Thanks for givig me lttl space in your life...Thnks for helping me when my violin broke...Thnks for listening all those "weird sounds" as MUSIC...
Thnks for evrythng... :-)

Sunday, July 17, 2011

भ्याड हल्ला (???)

बॉम्बस्फोटानंतर जागो जागी तत्परतेने श्रद्धांजली, निषेधाचे फलक लागले. ( इतकी तत्परता हवी तिथे दाखवली असती तर...असो...)
तर त्यातल्या एका फलकात "बॉम्बस्फोटाच्या भ्याड हल्ल्याचा" निषेध केला होता.
"भ्याड हल्ला"...???
ते इथे तुमच्या देशात तुमच्या नाक्कावर टिच्चून दिवाळीत फटाके फोडावेत इतक्या सहजतेने बॉम्बस्फोट करतात...
तुम्ही त्यांचे काहीही वाकडे करू शकत नाही ह्याची जणू खात्री बाळगून येता जाता तुम्हाला टपल्या मारतात.
तुम्ही षंढपणे 'प्रत्येक हल्ला सरकार रोखू शकत नाही..." अशी तुमच्या नाकर्तेपणाची जाहीर कबुली देता...
आणि त्यांच्या हल्ल्यांना भ्याड हल्ले कसले म्हणता...?
तुम्ही नाकर्ते आहात राव...ते भ्याड वैगरे मुळ्ळीच नाहीयेत...मुळ्ळीच नाही :-( :-( :-(

Monday, June 27, 2011

मी आणि violin

नीट वाजतच नव्हते violin. Positions बरोबर होत्या....bow हि perfect होता पण बिनसले होते काहीतरी...
हवे तसे सूर उमटतच नव्हते...
.
.
खूप दिवसांनी लिहितेय ब्लॉग वर. हे काही नवीन नाही म्हणा, पण ह्या वेळी आळशीपणा एवढेच कारण नव्हते. काही सुचत नव्हते असेही नाही...
लिहायला सुरुवात हि केली बरेचदा...पण दोन चार शब्द लिहून झाल्यावर, लिहावसे वाटेच ना...
.
.
खूप काही try केले...तारा पुसून घेतल्या...bow चे tension कमी जास्त करून पाहिले...पण काही केल्या सूर नाही सापडले.
.
.
खूप पसारा झाला होता आतल्या आत. अस्ताव्यस्त पडले होते सगळे विचार...एक मेकात अडकून गुंता झाला होता सगळ्याचा.
काही बोलायला गेले कि भांडण च व्हायचे...माझ्या सगळ्या बोलण्याचा उलटा अर्थ च निघत होता.
.
.
एवढे सगळे केल्या नंतर मात्र violin पेटीत ठेऊन दिले. नाहीच वाजवायचे मला...हड्ड...गेले उडत...
.
.
गप्प च बसणारे आत्ता. कोणाशी काही बोलायचेच नाही मुळी मला.
.
.
पण कित्ती दिवस बंद ठेवणार ना...violin...पेटीत. कसे तरीच व्हायला लागले. वाजवत राहिल्या शिवाय कसे कळणार कुठे काय बिनसतंय ते...?
.
.
बोलायला हवे... मनातला कचरा काढून टाकल्या शिवाय नव्या साठी जागाच नै उरणार...ज्याच्या वर राग होता त्याला तसे स्पष्ट सांगून टाकले.
हे जे काही तू वागला आहेस...ते नाही आवडलेय मला. उग्गाच गोड गोड राहण्या साठी खोटे बोलून काय फायदा...?
ना धड चांगले वागता येत...आणि ना धड शिव्या घालता येत. आणि मग असा त्रास होत राहतो.
.
.
situation कोणतीही, कशीही असली तरी, पळून जाण्याने काहीच सध्या होत नाही...हे कळतेय हळू हळू...
बोलायला हवेच...घुसमट वाढवण्या पेक्षा बोलून मोकळे झालेलं बरे,
.
.
Tuning केलेय आत्ता...सूर हि सापडतायत...छानसे काही वाजेल बहुदा आत्ता. आणि काही झाले तरी...आत्ता पेटीत नै बंद करायचे...हेही ठरलेय माझे. :-)

Friday, April 8, 2011

सुट्टी

सुट्टी...सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा विषय. आणि आजकाल काहींच्या हेव्याचा पण... ;-)
तर...सुट्टीत एक सर्व साधारण प्रश्न सतत येऊन कानाला बोचत असतो. मग आत्ता काय करणार सुट्टीत? अर्रे... वर्षभर इतके डोकी फोडत असतो...तर सुट्टीत हि काहीतरी करायलाच हवे का? शांत निवांत बसूच नये कि काय माणसाने?
( अर्थात हे माझ्या सारख्या महा आळशी लोकांचे मनोगत आहे तेव्हा समजून घ्या...) पण एकूणच मुलांनी सतत गुंतून पडावे
असे का वाटते राव सगळ्यांना?
हे शिबीर ते courses...एक न हजार गोष्टी. सुट्टीत मज्जा करण्याची concept नाहीच उरलीये बहुदा आत्ता.
( बहुतेकदा मुलांचा हट्ट असतो वैगरे सगळे ठीके...मी पण केलीयेत बर्रीच नाटके सुट्टीत.) पण Forcefully, केवळ मुले अडकून रहावीत ह्या उद्देशाने आई बाबा इकडे तिकडे नवे नोंदवतात ना मुलांची ते नाही आवडत मला...
कधी कधी तर ह्याचा मुलगा हे करतोय आणि त्याची मुलगी ते करतेय म्हणून आई बाबा मुलांना पिटाळतात सगळीकडे ते तर भार्रीच
irritating असते.
आजू बाजूची लहान मुले खरेतर इतर वेळी जास्त मजा करत असतात, असे general observation आहे माझे.
सुट्टी आई बाबांच्या म्हणण्या प्रमाणे च घालवली जाते शक्यतो...
माझ्या मते...सुट्टी झोपायला, खेळायला, काही न करता आळशी पणे बसून राहायला, TV वर उग्गाच काहीही nonsense बघायला, तासान तास फोन वर बोलायला आणि आई बाबांना न आवडणार्या अनेक गोष्टी करून वर "...मग सुट्टी सुरु आहे न माझी" असे ऐकवायला असते.
त्यामुळे मी तरी "काहीही" न करता छान हात पाय पसरून आराम करतेय सुट्टीत...उन्हाळ्याची सुट्टी ह्या साठीच तर असते न...what say? ;-)

Saturday, December 25, 2010

संवाद

"जल्दी चल...लेट हो रहा है...mam will not allow us to enter..."

" अरे वोह क्या उसकी माँ भी लेगी class में...चल तू...इतना क्या डरने का..."

" ओये होए... तो white shirt बघ...लवकर...सहिये ना...? "

" ही वेळ आहे का...मुले बघायची...? मूर्ख..."

" का? तू काय मुहूर्त काढून ठेवालायस का... special...? "

" दरवाजा तू knock कर..."

" May I come in mam...?"

" You are too early for next lecture बेटा..."

"-----"

"come in"

" Thank you mam..."

" अबे ऐ...रफ बुक है क्या? अच्छा चल पेज फाड़ के दे... और पेन कौन देगा..."

" Assignment complete आहे का...?"

"????????"

" हे राम... तुला विचारले हीच चूक झाली..."

" माहित्ये ना...मग कशाला विचारलेस... !@#$%^&?"

" Useless..."

" हेय guys...क्या करनेका...? lec बैठना है k bunk मारनेका...?

" coin टॉस kar... हेड आया तो बैठनेका"

" हेड... :("

" तो टेल आने तक टॉस कर... :P"

"@#$%^&"

" पक रहा है रे..."

" जीव दे मग... हा पण आधी...माझे ११ Rs परत कर...zerox चे... :P"

" @#$%^&*"

" ऐ उधर देख..तेरी वाली जा रही है...किसी और के साथ है..."

" @#$%^&*("

"भूक लगी है...किधर जाने का...? Mac D...CCD...खाऊ गल्ली...?

कोरस : " Canteen" :-D

Saturday, November 20, 2010

कविता ;-)

एक मित्राला काही कारणास्तव एक कविता लिहून हवी होती, नविन नविन प्रेमात पडलेल्या मुलाच्या point of view मधून काहीतरी लिहून हवे होते त्याला...
तेव्हा हे लिहून दिले होते....बर्रेच दिवस झाले ब्लॉग वर काही लिहिले नाही म्हणून आणि आज काल buzz वर सगळ्याना कवितेचा कीड़ा चावला आहे, तेव्हा म्हटले मी ही ब्लॉग वर एकदा पद्य publish करून बघते... so, here it is... :-)
कसे सांगू मित्रा
काय वाटतय मला
पहिल्यांदाच तिला बघितल्यावर हा पोरगा बरबाद झाला
खाणे, पिणे झोपणे सगळाच वांदा झाला
प्रेमात पडलो यारा...मी प्रेमात पडलो यारा...

डोळ्याच्या कोपर्यातुन हळूच बघणे
गालाला खळी पाडून गोड गोड हसणे
नजरेसमोरून माझ्या काही केल्या जात नाही
तिच्या शिवाय दिवस माझा उगवत नाही , मावळत नाही
तिच्याशी एकदा बोलायला जीव वेडा झाला
प्रेमात पडलो यारा...मी प्रेमात पडलो

नविन वाटे जग सारे, नविन सागर, नवा कीनारा
नविन चन्द्र नविन तारा
नविन पाउस नवा वारा
च्यायला आज काल कवितेच्या ओळी ही लागल्या सुचायला
प्रेमात पडलो यारा...मी प्रेमात पडलो यारा...

कट्ट्यावर आजकल जीव कसाबसा रमवतो
शिवी देताना ती बाजूला नसल्याची खात्री करून घेतो
वेळेवर जातो कॉलेजला, सगळी lectures attend करतो
बस,, मी सभ्य मुलगा आहे याच्या वर विश्वास तिचा बसावा
कारण मी प्रेमात पडलो यारा...मी प्रेमात पडलो यारा...!!! :-)


Sunday, October 31, 2010

नया कॉलेज, नया प्यार, आणि पोपट...

तिच्या साठी तेव्हा campus मधली प्रत्येक कळी उमलत होती.

हळूच त्याला बघताना , गालावर पुसटशी खळी उमटत होती

जास्तच अलंकारिक झाले न..पण असेच काहीसे सुचत होते तेव्हा तिला...!

साधे नाव ही माहित नव्हते कित्येक दिवस...!

कित्ती खट पट केली होती....नाव , त्याच्या lectures चे timings वैगरे शोधण्या साठी

हुश... ;-)

हळू हळू ओळख वाढली...बोलणे वाढले

कधी usual talk तर कधी थोडेसे flirting :P व्हायला लागले

कधी कधी मनात यायचे तिच्या...ह्याला कळले आपल्या मनातले तर बरे होइल

पण दुसर्याच क्षणी वाटायचे नको राव, जे आणि जसे चाललेय तेच बरेय...ह्याला कळले तर मजाच निघून जाइल सगळी...काही excitement च राहणार नै...!!!

आणि अचानक तिची ती तिने परत मागुन घेतलेली wish, त्याला सगळे कळावे वाली

न जाणो कशी पण च्यायला पूर्ण झाली

मग काय, माशीच शिंकली, आणि तिची ती सगळी excitement पार विरघळून गेली...

तिला तो तसा नक्कोच होता कधी...पण कोणी तरी आवडण्याचे ते मस्त फीलिंग मात्र हवे होते !

आत्ता... त्याला बघण्यासाठी इथून तिथे उगीचच फिरण्यात, मैत्रिणीला फ़ोन करून " अरे आज क्या बोला पता है वोह...सुन ना कमीनी..." ऐकवण्यात, आणि इतराना मात्र " No re..nthng like tht...I dnt like any one...Rather m nt interested at all in such crappy things..." सांगण्यात काही मज्जाच उरली नव्हती...
कारण आत्ता ती खर्रेच ह्या Crappy thing मधे interested नव्हती...!!!
:-( :-( :-(









Friday, October 29, 2010

आपुल्याच बोली वरती कुणाची मालकी...???

खूप दिवसां पासून ह्या विषय वर लिहायचे मनात होते, पण राहूनच गेले... आळशी पणा मुळे... असो, तर
point is, हल्ली मराठी बोलणे किंवा मराठीचा बोलण्याचा आग्रह धरणे हा एखाद्या पक्षाचा, माणसाचा trade mark होउन गेलाय. बर्याचदा तुम्ही मराठीत बोलण्याचा आग्रह वैगरे केला तर..."ओहो राज ठाकरे influence हां..." किंवा... "मनसे झिंदाबाद" असाच काहीतरी ऐकायला मिळते. निदान मला तरी बर्याचदा असा अनुभव आलाय.
एकदा कॉलेज मधे दोन मराठी मुली एकमेकांशी हिंदीत बोलत असताना मी त्याना टोकले...तुम्ही दोघी मराठीच आहात न...मग एकमेकींशी हिंदीत का बोलताय, तर मला मिनिएचर राज ठरवण्यात आले.
क्लास मधे सुद्धा एकदा, एक teacher ने मला विचारले होते, " तू हमेशा मराठी में क्यों बोलती है...? राज ठाकरे की follower है क्या? "
मला खर्रेच कळत नाही मराठी बोलणे कुणाची मक्तेदारी आहे का...? मी मराठी आहे म्हणून मराठी बोलते...that's it... त्यात कुठल्या राजकीय पक्षाचा किंवा एखाद्या माणसाचा वारंवार उल्लेख करण्याची काय गरज? आणि माझ्याच राज्यात माझीच भाषा बोलण्याची सहज कृति इतकी noticeable ठरत असेल तर ही खर्रेच काळजीची गोष्ट आहे...!!!

Thursday, September 30, 2010

परीक्षा...

का...का...येतात ह्या परीक्षा...??? परिक्षेची तारीख declare झाल्या झाल्या मी बोम्बा ठोकायला सुरुवात केली...!!!
तितक्यात एक मैत्रीण माझ्या जवळ आली...आणि तोफ सुरु केली...."तेरे पास FHS notes है क्या? पता भी है तुझे की mam ने किस chapter के नोट्स दिए है...??? अच्छा...और Important questions जो mam ने दिए थे उस दिन जब तू book में Hello Kity के Drawings बना रही थी...वोह भी नहीं होंगे ना...???"
मी completely clueless...!!! :(
आणि मग तोफ पार्ट २ सुरु... " ह्या घे नोट्स.....सुधारणार नाही ना तू कधी..."

माझ्या चेहर्यावर गोड smile... :-) आणि Thank you चे invisible tags... ;-)
आणि मग पूर्ण दिवसभर हेच सुरु....एकमेकांची विचारपूस। तुझ्या कड़े हे आहे का? ते हवेय का?

"अरे..तुला Accounts शिकवायचे आहे न..? चल आत्ताच शिकवते पटकन.. " Hey...guys...I have Law notes...That day some one asked me about it...want it...?" असे संवाद सुरु होते...
नेहमी स्वताच्या धुंदीत असणारे cute couples इतरांशी शिस्तीत बोलत होते. Attitude देणारे लोक सुद्धा सगळ्याँशी चांगले वागत होते...!!!

Team work चे महत्व समजावे म्हणून दिलेल्या group projects, group assignment submission ने झाले नव्हते ते ह्या परीक्षां मुळे झाले...!!!
At the end of the day...."ह्या परीक्षा का असतात???" ह्याचे उत्तर मला मिळाले होते... :-)

Sunday, August 22, 2010

अनुवाद...( ??? )

देवेन दादा कडून खो मिळाल्यामुळे हे अनुवाद वैगरे करण्याचे धाडस मी करत्येय...नाही तर कधी चुकुनही ह्या प्रकारच्या वाटेला मी गेले नसते...( देवेन दादा कडून खाऊ मिळाला पाहिजे मला ह्या धाडसासाठी... :P आणि निमूट पणे त्याचे ऐकल्या बद्दल पण... ;) )
असो, तर... मी दोन गाण्यांचा भावानुवाद केलाय. पहिले गाणे, गौरव चे college days... हे माझे खूप आवडते गाणे आहे...त्याची वाट लावायला नको होती मी खरेतर पण सद्ध्या मी खर्रेच खूप miss करत्येय माझे जुने कॉलेज.
त्या मुळे ह्याचा अनुवाद केला...
Original lyrics -
कब मिलेंगे नजाने हम यारों फिरसे सभी...
लौट कर अब न आयेंगे वोह मस्ती भरे दिन कभी
हो....दिल ये अपना कहे के ऐ दोस्तों...
I m really gonna miss this place
M gonna miss my college days
याद हैं वोह सारे lectures हमने जो बंक किये थे
proxy का पकड़ा जाना और लफड़े क्या कम किये थे
मिलके लिखना वोह journals और submission लास्ट min पे
exms की वोह तय्यारी और लिखना वोह तीन घंटे और बाहर आके वोह कहना
" साला क्या बेक्कार पेपर सेट किया था यार..."
मिलता 1st class कभी यंहा तो लगती थी KT कभी
लौट कर अब न आयेंगे वोह मस्ती भरे दिन कभी
ओ दिल अपना कहे के ऐ दोस्तों
M really gonna miss this place
M gonna miss my collge days
याद आयेंगे teachers हमको दिल से हमेशा
याद आएगा ये campus और इसकी अपनी दुनिया
ओ याद हमेशा ये आशियाँ

M really gonna miss this place
M gonna miss my college days.......
अनुवाद -
पुन्हा केव्हा भेटू आपण सगळे, माहीत नाही
मजेचे हे दिवस कधी परतुनी न येती
मन माझे म्हणतय... मित्रानो
ही जागा मी खूप miss करणार आहे...आणि हे सुंदर दिवस माझ्या कायमचे स्मरणात राहणार आहेत
आठवतायत ती सगळी lectures आपण जी बंक केलेली
proxy चे पकडले जाणे
आणि लफडी काय कमी केलेली
मिळून लिहिणे ते Journal आणि देणे शेवटच्या क्षणाला
परिक्षेची तयारी करणे आणि तीन तास पेपर खरडणे
आणि बाहर येउन बोंब ठोकणे....च्यायला काय बेक्कार पेपर सेट केला होता यार
मिळायचा 1st class कधी येथे तर लागायची KT कधी
मजेचे दिवस हे परतुनी न कधी येती
हो...मन माझे म्हणतय की दोस्तहो....ही जागा मी मिस करणारे आणि हे फूल पंखी दिवस माझ्या कायमचे स्मरणात राहणार आहेत
आठवतील सगळे teachers मनापासून नेहमी
आठवेल हा campus, आणि इथली दुनिया वेगळी
ho ...आणि आठवतील टवाळक्या इथे केलेल्या....
ओ...मी ही जागा खूप मिस करणार आहे...आणि हे कॉलेज चे दिवस माझ्या नेहमी स्मरणात राहणार आहेत
हुश्ह....!!! संपले बुवा एकदाचे...( perfect ओळखले की नै मी तुमच्या मनातले...)
आता दुसरा अनुवाद.....
पुढच्या पोस्ट मधे.............. तुम्हाला पण कित्ती torture करायचे नै का मी....??? आत्ता पुरते एवढा त्रास बास....

Sunday, August 8, 2010

माझे widget code

माझ्या ब्लॉग चे पण widget code आहे आत्ता...Yeeppiieee...(चला पांचटपणा खूप झाला...)
तर, माझ्या ब्लॉग चे widget code तयार करून दिलय मला अभिजित वैद्य दादा ने. जाम पीडले बुआ मी त्याला...
आणि नंतर ते blog वर चिकटवताना सुहास दादा ला पण. दोघानी केलेल्या मदती बद्दल त्याना पुन्हा एकदा खूप खूप Thanks...!!! :)
बर्र, आत्ता थोडेसे image बद्दल..., जेव्हा पहिल्यांदा widget बनवायचे मनात आले ना, तेव्हा पासून हीच image होती डोक्यात. Maithili Thinks नावाला एकदम perfectly suit होणारी. बघा न ती पण विचार करत्येय...( "पण" ह्या शब्दातून मला काय व्यक्त करायचेय हे कळले असेलच नै का तुम्हाला... ;) )
असो, तर widget code कसा वाटला...ते कळवा नक्की... :)

Friday, July 16, 2010

माझा अव्यवस्थितपणा

माझा अव्यवस्थितपणा...खरेतर ह्या विषयावर पोस्ट लिहिणे म्हणजे स्वताच स्वत:चा कचरा करून घेण्या सारखे आहे...पण अत्ता मी आहे अशी तर आहे...काय करणार...? आणि तसेही इथे सगळे "आपलेच" आहेत...सो, लिहुयात बिनधास्त, असा विचार करून मी लिहितेय एकदाचे...!!!
मी ह्या विषयावर लिहिणार आहे असे जेव्हा माझ्या एक मैत्रिणीला सांगितले तेव्हा ती म्हणाली , " ब्लॉग वर प्रबंध पण लिहिता येतो...? " सो, माझ्या बाबतीत ह्या विषयाचा आवाका केवढा मोठा आहे हे तुम्हाला कळले असेलच...पण काळजी करू नका...एवढा वेळ नाही पकवणार मी ( शेवटी स्वत:ची लाज किती काढायची याला पण लिमिट आहे न) तर, मी अत्यंत पसारेबाज, अव्यवस्थित , impossible, horrible, त्रासदायक अशी कार्टी आहे...( असे इतरांचे मत आहे माझ्या बाबतीत) :(
माझ्या गोष्टी कधी जागेवर मिळत नाहीत, मी घरी असले की घराचा उकिरडा होतो, माझे कपाट उघडल्या नंतर जर कोणी ढाल घेउन उभे नाही राहिले तर त्यांची खैर नाही, माझ्या कपाटातून किंवा माझा वावर असलेल्या कुठल्याही जागेतून हवी ती गोष्ट किमान एक तासात शोधून काढणार्या व्यक्तीला पुरस्काराने सन्मानित करायला हवे, मला जर Nepolian भेटला असता तर त्याने सगळ्या Alphabetical orders चे नियम मोडून Dictionery च्या पहिल्या पानावर IMPOSSIBLE हा शब्द लिहिला असता...अशीही काही मते आहेत त्यांची माझ्या बाबतीत... ( एक छोट्याशा मुलीला कित्ती ऐकवतात ही माणसे?? )
माझ्या ह्या गुणा मुळे मी रोज न चुकता सकाळ, दुपार, संध्याकाळ आई बाबा आणि मित्र मैत्रिणीन्च्या शिव्या खात असते...अर्थात त्याना पूर्ण आधिकार आहे ह्याचा...!!! ( का ते सांगत नाही इथे...नाहीतर सहनुभूतिचा पूर येइल...) पण खर्रेच खूप त्रास दिलाय मी त्याना...
शाळेत असताना माझ्या मैत्रिणी माझी bag भरायच्या..,माझी बेंच पार्टनर तर बिच्चारी टिचकी मारली तरी खाली पडेल इतक्य कमी जागेत बसायची...माझ्या वस्तु सगळा वर्ग मिळून सम्भाळायचा...दहावीत असताना तर आई ने दोन फ्रेंड्स ना जबाबदारी दिलेली माझ्या वस्तुंची...त्या माझे हॉल टिकेट, stationery सगळे चेक करून, bag मधे भरून मगच बाहेर पडायच्या...
हे सगळे झाले त्यांच्या पॉइंट ऑफ़ view मधून, पण माझे म्हाणणे असे आहे की ह्यातच जास्त मज्जा येते...Its fun...म्हणजे बघा ना सगळ्या वस्तु जर जागच्या जागी सापडायला लागल्या तर सकाळी घरून निघतानाची घाई गड़बड़, कटकट , स्वत:लाच घातलेल्या शिव्या , सैरभैर पणा miss कराल ना? घर "घर" वाटेल? कधीतरी एकदा आई चा ओरडा खाल्ल्या नंतर किंवा परिस्थिति अगदीच हाताबाहेर गेल्या नंतर आवरावा लागलेला पसारा...आणि तो आवरताना खूप दिवसांपूर्वी हरवलेली एखादी वस्तु मिळाल्या नंतरचा आनंद सुद्धा miss कराल न??? आणि इतकेच काय तुमच्या आजू बाजुच्या 'अशा' व्यक्ति सुधारल्या न तरी त्यांचा पसारा तुम्ही खात्रीने miss कराल...!!! :)

Thursday, June 10, 2010

पाउस

कित्ती सही वाटतय न, पहिला पाउस आलाय....! हिरवीगार झाडे, चकचकीत रस्ते, raincoat छत्र्या घेण्यासाठी दुकानात झालेली गर्दी, पाणी साठलेल्या प्रत्येक खड्ड्यात दोन्ही पाय एकत्र करून उडी मारणारी लहान मुले, एकाच छत्री तून जवळ जवळ भिजतच चालणारी couples, हे सगळे पाहणे सुद्धा कित्ती रेफ्रेशिंग असते नै...!!!
पण अर्थात सगळ्यानाच पाउस इतकाच आणि असाच सुंदर वाटतो असे नाही... मला तर आधी पटायचेच नाही की पाउस न आवडणार्या व्यक्ति सुद्धा असतात म्हणून... पण माझ्या आजू बाजुलाच अशी खूप लोक आहेत ज्याना पाउस conditionally आवडतो.
म्हणजे, पाउस आवडतो पण फक्त खिड़कीतून बघायला, सगळे आवरून घराबाहेर पडल्यानंतर पडणारा पाउस नाही आवडत, कॉलेज ला जाताना पडलेला पाउस नाही आवडत, पण येताना पडलेला ठीक वाटतो, पावसातला गारवा छान वाटतो पण चपलेत शिरणारे पाणी नै आवडत... बाप रे...कित्ती त्या terms and conditions पाउस न आवडण्याच्या... असो पाउस न आवडणे काही पाप नाहीये...आणि मी काही कोणाला पाउस आवडण्याची जबरदस्ती सुद्धा नाही करू शकत पण माझ्या साठी हे सगळे खरेच खूप confusing आहे... सव्वा सात ला पडलेला पाउस वाईट वाईट असतो आणि साडे दहा ला पडलेला पाउस छान छान...असे कसे काय...???
मला तर बुवा कधीही , कुठेही, कसाही पडलेला पाउस आवडतो...!!! माझ्या साठी तो सव्वा सात, साडे नऊ, पावणे दहा प्रत्येक वेळी सुंदर च असतो...!!! घरातून बाहेर पडताना, घरी परत येताना कधीही आलेला पाउस मी सारखाच enjoy करते...!!! पावसाच्या प्रत्येक सरीत माझ्या साठी दर वेळी आनंद च आनंद बरासत असतो...!!! So, तुम्हला कसा आवडतो पावसाळा...??? with conditions की without any condition...???
असो तुम्हाला पावसाळा कसाही आवडत असला तरी हा पावसाळा तुम्हला खूप खूप मजा मस्तीचा आणि आनंदाचा जावो ही सदिच्छा.....!!! :) Happy Mansoon...!!!

Friday, May 28, 2010

आई, बाबा आणि consideration...

प्रसंग १ - मी आणि माझ्या दोन मैत्रिणी गप्पा मारत होतो, आणि विषय होता "आई बाबांची ड्रेसिंग स्टाइल" .
हल्ली आपले आई बाबा बदलले आहेत असे आमचे ठाम मत होते. " शूज पासून ते चष्म्याच्या फ्रेम पर्यंत सगळे च एकदम अपडेट झालेय...म्हणजे त्यांची पूर्वीची ती बोअरिंग स्टाइल सोडून एकदम टकाटक रहत आहेत...completely fresh look झालाय यार त्यांचा..." आणि हे आम्हा कोणाच्याच पचनी पडत नव्हते...म्हणजे त्यांची ती बोअरिंग स्टाइल च बरी होती असे वाटायला लागले होते... "ते असतील dudes/ beauties of their time पण आत्ता ते आपले आई बाबा आहेत यार.... don't you think so की त्यानी आपल्या आई बाबां सारखेच राहिले पाहिजे...???" असा काहीसा (वाईट ) attitude होता आमचा.... अर्थात हे सगळे काही आम्ही त्यांच्या पाशी बोलणार नव्हतो की त्याना तसे वागायला ही लावणार नव्हतो पण मनात कुठेतरी हे सगळे होतेच...
प्रसंग २ - क्लास मध्ये आमची इंग्लिश ची mam कशावरून तरी काहीतरी बोलत होती आणि तिने विचारले की "don't you think your mom n dad needs a privacy...???" आणि आम्ही सगळे च एका सुरात नो म्हणालो . आणि आम्हाला त्याचे काही ख़ास वाटले सुद्धा नाही...
पण गेल्या काही दिवसात असे वाटायला लागलेय की अरे आपण आपल्या आई बाबा ना कित्ती गृहीत धरतो नै...
आपल्या शिवाय त्यांचे दुसरे असे parallel world अस्ताच कामा नये , त्यानी सतत आपल्या आई बाबांच्या च भूमिकेत असेल पाहिजे असे काहीसे...
कित्ती दिवसात आई बाबा एकटेच movie, dinner किंवा shopping ला गेलेच नाहीयेत ...अगदीच काही मोजके प्रसंग सोडले ( जेव्हा मीच नाही येणार असे सांगितले होते ) ते सोडले तर ते मला सोडून only for fun उद्देशाने कुठे गेलेच नाहीयेत....
माझे आई बाबा असण्याच्या आधी ते एकमेकांचे काहीतरी लागतात हे विसरलोच होतो की आपण....म्हणून मग त्यांच्या येत्या anniversary ला "तुम्ही दोघेच जा न कुठेतरी मी कशाला पाहिजे " असा सूर लावला पण ते जे बोलले ना ते ऐकून ज़रा बरे वाटले..."आम्ही तुझ्या जन्माच्या आधी कोणाचेही काहीही असलो ना तरी तू आमच्या आयुष्यात आल्या नंतर सगळ्यात आधी आम्ही आमच्या पिल्लू चे आई बाबा आहोत..."
अर्थात आता याच्या पुढे आम्ही सुद्धा they needs a freedom too... हे लक्षात ठेवायचे ठरवले आहे, मात्र आपल्या शिवाय त्यांचे जग पूर्ण होत नाही तेव्हा अगदीच काही वाईट वाटुन घ्यायचे कारण नाही हे ही आम्हाला कळले आहे..... :)

Thursday, May 20, 2010

शिक्षणाच्या आयचा घो..!!!

काही दिवसां पूर्वी मी माझ्या काका कड़े गेले होते, तिथे एकदम विचारमग्न अवस्थेत माझी बहिण बसली होती. तिला विचारले तर म्हणाली , " ताई , तुझा advise हवाय मला , मी आत्ता अभ्यास करू की नको करू ग...??? नाही म्हणजे आठवी पर्यंत मी तसेही पास होणारच आहे न म्हणून विचारले...." मग मी थोड़े समजावले तिला की अरे आत्ता पास होशील तू पण मग 9th आणि 10th मध्ये तर करावाच लागेल न अभ्यास. आणि खरेतर 4th to 8th चाच अभ्यास जास्त महत्वाचा असतो , आत्ता अभ्यास केलास तर 9th आणि 10th मध्ये जास्त मेहनत नै करावी लागणार तुला वैगरे वैगरे बौद्धिक घेतले तिचे...!!! तिला समजावले पण मीच गोंधळात पडले . अरे काय हे , काडीचा तरी अर्थ आहे का या GR ला...??? आठवी पर्यंत कोणालाही नापास करणार नाही . विद्यार्थ्यां वरचा ताण दूर करण्यासाठी हा उपाय योजला आहे म्हणे...!! (?????)
अरे @ $ #% $& नो जर खरेच असे काही करायचे असेल न तर आधी सावळा गोंधळ कमी करा तुमच्या व्यवस्थेतला . आम्हाला अभ्यास करून ताण नाही येत हो तर मेहनत करून सुद्धा तुमच्या मुर्खपणा mule भोगावया लागणार्या मनस्तापाचा होतो. रोज नव नविन नियम, अटी, कायदे ...आणि बरे त्याच्या वर सुद्धा ठाम रहायचे नाही. percentile पद्धत काय , online admission काय , जिल्हा quota काय ... अगदी अक्कल नाम शून्य असल्या सारखे वागत असतात.
आम्ही नववीत असताना वर्षाला ६ परीक्षा घेण्याचे ठरवले. आम्ही सुटलो खरेतर दोन वर्षात पण अजुनही हा मूर्ख् पणा सुरु आहे...अरे मुले म्हणजे काय ओझ्याची गाढवे वाटली का याना?? आणि मग ह्या वरुन शिव्या खाल्ल्या की "आठवी पर्यंत नापास च करणार नाही " असा फतवा काढायचा...( ह्या नियमाने काय साध्य होणार आहे खरेच कळले नाहीये मला...)
आमच्या दहावी च्या परिक्षेच्या वेळेला , परीक्षा दोन दिवसांवर आलेली असताना Algebra च्या एक chapter मध्ये सुधारणा पाठवल्या. मग आम्ही सगळे शाळेत गेलो, नविन पद्धत शिकलो, त्या नविन problems च्या आणि त्यांच्या method च्या zerox घेतल्या , आमचा पूर्ण दिवस त्याच्या पाठी वाया घालवला आणि आम्हाला परिक्षेच्या दिवशी कळले की जुन्या method ने sums solve केली तरी चालणार आहे .
आमच्या admissions च्या वेळी तर कहर च केला होता...एका जिल्ह्यातल्या लोकाना दुसर्या जिल्ह्यातल्या कॉलेज मध्ये preference नाही ,( हा सुद्धा एक गाधव पणा चा कळस ह्याने पण काय साध्य झाले मला कळले ले नाहीये...नंतर मग त्यांच्या वर केस केली आणि हा नियन काढून टाकला..पण आमचे जे नुकसान व्हायचे होते ते झालेच....)
खेळ वाटतो का याना शिक्षण म्हणजे...??? आणि आम्ही त्यांच्या तालावर नाचणारी खेळणी...??? ह्यांचे हे असे बिनडोक पणाचे GR निघाले न की खरेच म्हणावसे वाटते " ह्या शिक्षणाच्या आयचा घो..." !!!!

Saturday, May 15, 2010

माझी पहिली खादाडी पोस्ट....

आज पर्यंत ब्लॉग विश्वतल्या खाद्य चळ्वळीत माझा मूक सहभाग असायचा , ह्या पुढे मात्र मी सुद्धा सक्रीय व्हायचे ठरवले आहे... खादाडी वर लिहायला कित्ती तरी विषय होते डोक्यात पण पहिली पोस्ट आपल्या सगाल्यान्च्याच आयुष्यात खादाडी ला खर्या अर्थाने सुरुवात करणार्या शाळेतल्या डब्या पासून.... !! इतरांच्या घरातली खाद्य संस्कृति डब्या मुळेच कळते, खादाडी ला सोबत करणारे जीवा भावाचे सोबती इथेच मिळतात म्हणून...!! शाळेत असताना आमचा सगळा ग्रुप अत्यंत खादाड होता, वर्गात शिरल्या बरोबर hiiee, hello करायाच्याही आधी "आज डब्यात काय आहे ?" हे विचारायचो... बाकीचे सगळे आम्हाला खादाड माऊ ग्रुप म्हणायचे... अर्थात त्याला तसे कारण सुद्धा होते, सगळा वर्ग शिस्तीत एक एक डबा आणायचे आणि आम्ही मात्र दोन तीन डबे न्यायचो picnic ला गेल्या सारखे... कधी fruits, कधी स्वीट्स, कधी स्वत: काही ख़ास बनवले असेल तर ते, कधी आजीने करून पाठवलेली लोणची, मुरम्बे ; काही तरी असायचेच. आमच्या ग्रुप ने फक्त पोळी- भाजी खाल्लीये असे झाल्याचे आठवतच नाही, रोजच्या regular डब्या व्यतिरिक्त हे असे subsidiary डबे असायचेच. बर हे सगळे झाल्या नंतर आम्ही "हप्ता वसूली" साठी जायचो, म्हणजे खरेतर आमच्या खाद्य प्रेमाची माहिती असलेले आमचे वर्ग मित्र/मैत्रिणी आम्हाला त्यांचा डबा खायला बोलावायाचे... एकदा अचानक आम्हाला अशी उपरती झाली की अरे एकतर आपण आपले डबे आपल्यातच संपवतो आणि हक्काने जाऊन त्याचे डबे खातो... so, lets stop this...असे ठरले. सो, त्याप्रमाणे आम्ही आमची वसूली बंद केली. एक दोन दिवसंनंतर हे सगळे आमच्या बेंच पाशी हजर, " आला का नाहीत डबा खायला" असा जाब विचारायला ते सुद्धा हातात आमच्या साथी डबे घेउन... :) अजुनही एक वेळ सगळ्यान्ची आडनावे नसतील लक्षात पण कोणाच्या डब्यातले काय काय स्पेशल असायचे ते चांगलेच लक्षात आहे. आणि कोणाच्या आवडीचे असे काही असेल तर आमच्या आया सुद्धा त्या त्या व्यक्ति साठी स्पेशल डबा द्यायच्या. It was not matter of taste only, कारन सगळ्यान कडून recepies घेउन सुद्धा काही ख़ास पदार्थ त्या डब्या तल्या चवीचे बनतच नाहीत... कारण त्यात; " ही चटनी फक्त आणि फक्त मैथिली साठी आहे " असे निक्षून सान्ग्णार्या काकूंचे प्रेम नसते, " I have made this , and its only for you" असे सांगुन इतरांच्या नकळत फक्त मला खायला घालणार्या , Assingnment पूर्ण करण्याच्या घाईत असताना मी जेव्हा डबा अर्धवट टाकुन पळायचे तेव्हा मला स्वता: च्या हाताने भरवणार्या friends चे प्रेम त्यात नसते.....!!! तो डबा , ती मजा मस्ती , गोंधळ , ते प्रेम सगळे खूप खूप miss करत्ये मी........
[ खादाडी पेक्षा Emo च झालीये ही पोस्ट महित्येय मला , पण पहिली पोस्ट मला ह्या विषया वर च टाकायची होती.....] :)