Sunday, July 17, 2011

भ्याड हल्ला (???)

बॉम्बस्फोटानंतर जागो जागी तत्परतेने श्रद्धांजली, निषेधाचे फलक लागले. ( इतकी तत्परता हवी तिथे दाखवली असती तर...असो...)
तर त्यातल्या एका फलकात "बॉम्बस्फोटाच्या भ्याड हल्ल्याचा" निषेध केला होता.
"भ्याड हल्ला"...???
ते इथे तुमच्या देशात तुमच्या नाक्कावर टिच्चून दिवाळीत फटाके फोडावेत इतक्या सहजतेने बॉम्बस्फोट करतात...
तुम्ही त्यांचे काहीही वाकडे करू शकत नाही ह्याची जणू खात्री बाळगून येता जाता तुम्हाला टपल्या मारतात.
तुम्ही षंढपणे 'प्रत्येक हल्ला सरकार रोखू शकत नाही..." अशी तुमच्या नाकर्तेपणाची जाहीर कबुली देता...
आणि त्यांच्या हल्ल्यांना भ्याड हल्ले कसले म्हणता...?
तुम्ही नाकर्ते आहात राव...ते भ्याड वैगरे मुळ्ळीच नाहीयेत...मुळ्ळीच नाही :-( :-( :-(

Monday, June 27, 2011

मी आणि violin

नीट वाजतच नव्हते violin. Positions बरोबर होत्या....bow हि perfect होता पण बिनसले होते काहीतरी...
हवे तसे सूर उमटतच नव्हते...
.
.
खूप दिवसांनी लिहितेय ब्लॉग वर. हे काही नवीन नाही म्हणा, पण ह्या वेळी आळशीपणा एवढेच कारण नव्हते. काही सुचत नव्हते असेही नाही...
लिहायला सुरुवात हि केली बरेचदा...पण दोन चार शब्द लिहून झाल्यावर, लिहावसे वाटेच ना...
.
.
खूप काही try केले...तारा पुसून घेतल्या...bow चे tension कमी जास्त करून पाहिले...पण काही केल्या सूर नाही सापडले.
.
.
खूप पसारा झाला होता आतल्या आत. अस्ताव्यस्त पडले होते सगळे विचार...एक मेकात अडकून गुंता झाला होता सगळ्याचा.
काही बोलायला गेले कि भांडण च व्हायचे...माझ्या सगळ्या बोलण्याचा उलटा अर्थ च निघत होता.
.
.
एवढे सगळे केल्या नंतर मात्र violin पेटीत ठेऊन दिले. नाहीच वाजवायचे मला...हड्ड...गेले उडत...
.
.
गप्प च बसणारे आत्ता. कोणाशी काही बोलायचेच नाही मुळी मला.
.
.
पण कित्ती दिवस बंद ठेवणार ना...violin...पेटीत. कसे तरीच व्हायला लागले. वाजवत राहिल्या शिवाय कसे कळणार कुठे काय बिनसतंय ते...?
.
.
बोलायला हवे... मनातला कचरा काढून टाकल्या शिवाय नव्या साठी जागाच नै उरणार...ज्याच्या वर राग होता त्याला तसे स्पष्ट सांगून टाकले.
हे जे काही तू वागला आहेस...ते नाही आवडलेय मला. उग्गाच गोड गोड राहण्या साठी खोटे बोलून काय फायदा...?
ना धड चांगले वागता येत...आणि ना धड शिव्या घालता येत. आणि मग असा त्रास होत राहतो.
.
.
situation कोणतीही, कशीही असली तरी, पळून जाण्याने काहीच सध्या होत नाही...हे कळतेय हळू हळू...
बोलायला हवेच...घुसमट वाढवण्या पेक्षा बोलून मोकळे झालेलं बरे,
.
.
Tuning केलेय आत्ता...सूर हि सापडतायत...छानसे काही वाजेल बहुदा आत्ता. आणि काही झाले तरी...आत्ता पेटीत नै बंद करायचे...हेही ठरलेय माझे. :-)

Friday, April 8, 2011

सुट्टी

सुट्टी...सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा विषय. आणि आजकाल काहींच्या हेव्याचा पण... ;-)
तर...सुट्टीत एक सर्व साधारण प्रश्न सतत येऊन कानाला बोचत असतो. मग आत्ता काय करणार सुट्टीत? अर्रे... वर्षभर इतके डोकी फोडत असतो...तर सुट्टीत हि काहीतरी करायलाच हवे का? शांत निवांत बसूच नये कि काय माणसाने?
( अर्थात हे माझ्या सारख्या महा आळशी लोकांचे मनोगत आहे तेव्हा समजून घ्या...) पण एकूणच मुलांनी सतत गुंतून पडावे
असे का वाटते राव सगळ्यांना?
हे शिबीर ते courses...एक न हजार गोष्टी. सुट्टीत मज्जा करण्याची concept नाहीच उरलीये बहुदा आत्ता.
( बहुतेकदा मुलांचा हट्ट असतो वैगरे सगळे ठीके...मी पण केलीयेत बर्रीच नाटके सुट्टीत.) पण Forcefully, केवळ मुले अडकून रहावीत ह्या उद्देशाने आई बाबा इकडे तिकडे नवे नोंदवतात ना मुलांची ते नाही आवडत मला...
कधी कधी तर ह्याचा मुलगा हे करतोय आणि त्याची मुलगी ते करतेय म्हणून आई बाबा मुलांना पिटाळतात सगळीकडे ते तर भार्रीच
irritating असते.
आजू बाजूची लहान मुले खरेतर इतर वेळी जास्त मजा करत असतात, असे general observation आहे माझे.
सुट्टी आई बाबांच्या म्हणण्या प्रमाणे च घालवली जाते शक्यतो...
माझ्या मते...सुट्टी झोपायला, खेळायला, काही न करता आळशी पणे बसून राहायला, TV वर उग्गाच काहीही nonsense बघायला, तासान तास फोन वर बोलायला आणि आई बाबांना न आवडणार्या अनेक गोष्टी करून वर "...मग सुट्टी सुरु आहे न माझी" असे ऐकवायला असते.
त्यामुळे मी तरी "काहीही" न करता छान हात पाय पसरून आराम करतेय सुट्टीत...उन्हाळ्याची सुट्टी ह्या साठीच तर असते न...what say? ;-)

Saturday, December 25, 2010

संवाद

"जल्दी चल...लेट हो रहा है...mam will not allow us to enter..."

" अरे वोह क्या उसकी माँ भी लेगी class में...चल तू...इतना क्या डरने का..."

" ओये होए... तो white shirt बघ...लवकर...सहिये ना...? "

" ही वेळ आहे का...मुले बघायची...? मूर्ख..."

" का? तू काय मुहूर्त काढून ठेवालायस का... special...? "

" दरवाजा तू knock कर..."

" May I come in mam...?"

" You are too early for next lecture बेटा..."

"-----"

"come in"

" Thank you mam..."

" अबे ऐ...रफ बुक है क्या? अच्छा चल पेज फाड़ के दे... और पेन कौन देगा..."

" Assignment complete आहे का...?"

"????????"

" हे राम... तुला विचारले हीच चूक झाली..."

" माहित्ये ना...मग कशाला विचारलेस... !@#$%^&?"

" Useless..."

" हेय guys...क्या करनेका...? lec बैठना है k bunk मारनेका...?

" coin टॉस kar... हेड आया तो बैठनेका"

" हेड... :("

" तो टेल आने तक टॉस कर... :P"

"@#$%^&"

" पक रहा है रे..."

" जीव दे मग... हा पण आधी...माझे ११ Rs परत कर...zerox चे... :P"

" @#$%^&*"

" ऐ उधर देख..तेरी वाली जा रही है...किसी और के साथ है..."

" @#$%^&*("

"भूक लगी है...किधर जाने का...? Mac D...CCD...खाऊ गल्ली...?

कोरस : " Canteen" :-D

Saturday, November 20, 2010

कविता ;-)

एक मित्राला काही कारणास्तव एक कविता लिहून हवी होती, नविन नविन प्रेमात पडलेल्या मुलाच्या point of view मधून काहीतरी लिहून हवे होते त्याला...
तेव्हा हे लिहून दिले होते....बर्रेच दिवस झाले ब्लॉग वर काही लिहिले नाही म्हणून आणि आज काल buzz वर सगळ्याना कवितेचा कीड़ा चावला आहे, तेव्हा म्हटले मी ही ब्लॉग वर एकदा पद्य publish करून बघते... so, here it is... :-)
कसे सांगू मित्रा
काय वाटतय मला
पहिल्यांदाच तिला बघितल्यावर हा पोरगा बरबाद झाला
खाणे, पिणे झोपणे सगळाच वांदा झाला
प्रेमात पडलो यारा...मी प्रेमात पडलो यारा...

डोळ्याच्या कोपर्यातुन हळूच बघणे
गालाला खळी पाडून गोड गोड हसणे
नजरेसमोरून माझ्या काही केल्या जात नाही
तिच्या शिवाय दिवस माझा उगवत नाही , मावळत नाही
तिच्याशी एकदा बोलायला जीव वेडा झाला
प्रेमात पडलो यारा...मी प्रेमात पडलो

नविन वाटे जग सारे, नविन सागर, नवा कीनारा
नविन चन्द्र नविन तारा
नविन पाउस नवा वारा
च्यायला आज काल कवितेच्या ओळी ही लागल्या सुचायला
प्रेमात पडलो यारा...मी प्रेमात पडलो यारा...

कट्ट्यावर आजकल जीव कसाबसा रमवतो
शिवी देताना ती बाजूला नसल्याची खात्री करून घेतो
वेळेवर जातो कॉलेजला, सगळी lectures attend करतो
बस,, मी सभ्य मुलगा आहे याच्या वर विश्वास तिचा बसावा
कारण मी प्रेमात पडलो यारा...मी प्रेमात पडलो यारा...!!! :-)


Sunday, October 31, 2010

नया कॉलेज, नया प्यार, आणि पोपट...

तिच्या साठी तेव्हा campus मधली प्रत्येक कळी उमलत होती.

हळूच त्याला बघताना , गालावर पुसटशी खळी उमटत होती

जास्तच अलंकारिक झाले न..पण असेच काहीसे सुचत होते तेव्हा तिला...!

साधे नाव ही माहित नव्हते कित्येक दिवस...!

कित्ती खट पट केली होती....नाव , त्याच्या lectures चे timings वैगरे शोधण्या साठी

हुश... ;-)

हळू हळू ओळख वाढली...बोलणे वाढले

कधी usual talk तर कधी थोडेसे flirting :P व्हायला लागले

कधी कधी मनात यायचे तिच्या...ह्याला कळले आपल्या मनातले तर बरे होइल

पण दुसर्याच क्षणी वाटायचे नको राव, जे आणि जसे चाललेय तेच बरेय...ह्याला कळले तर मजाच निघून जाइल सगळी...काही excitement च राहणार नै...!!!

आणि अचानक तिची ती तिने परत मागुन घेतलेली wish, त्याला सगळे कळावे वाली

न जाणो कशी पण च्यायला पूर्ण झाली

मग काय, माशीच शिंकली, आणि तिची ती सगळी excitement पार विरघळून गेली...

तिला तो तसा नक्कोच होता कधी...पण कोणी तरी आवडण्याचे ते मस्त फीलिंग मात्र हवे होते !

आत्ता... त्याला बघण्यासाठी इथून तिथे उगीचच फिरण्यात, मैत्रिणीला फ़ोन करून " अरे आज क्या बोला पता है वोह...सुन ना कमीनी..." ऐकवण्यात, आणि इतराना मात्र " No re..nthng like tht...I dnt like any one...Rather m nt interested at all in such crappy things..." सांगण्यात काही मज्जाच उरली नव्हती...
कारण आत्ता ती खर्रेच ह्या Crappy thing मधे interested नव्हती...!!!
:-( :-( :-(









Friday, October 29, 2010

आपुल्याच बोली वरती कुणाची मालकी...???

खूप दिवसां पासून ह्या विषय वर लिहायचे मनात होते, पण राहूनच गेले... आळशी पणा मुळे... असो, तर
point is, हल्ली मराठी बोलणे किंवा मराठीचा बोलण्याचा आग्रह धरणे हा एखाद्या पक्षाचा, माणसाचा trade mark होउन गेलाय. बर्याचदा तुम्ही मराठीत बोलण्याचा आग्रह वैगरे केला तर..."ओहो राज ठाकरे influence हां..." किंवा... "मनसे झिंदाबाद" असाच काहीतरी ऐकायला मिळते. निदान मला तरी बर्याचदा असा अनुभव आलाय.
एकदा कॉलेज मधे दोन मराठी मुली एकमेकांशी हिंदीत बोलत असताना मी त्याना टोकले...तुम्ही दोघी मराठीच आहात न...मग एकमेकींशी हिंदीत का बोलताय, तर मला मिनिएचर राज ठरवण्यात आले.
क्लास मधे सुद्धा एकदा, एक teacher ने मला विचारले होते, " तू हमेशा मराठी में क्यों बोलती है...? राज ठाकरे की follower है क्या? "
मला खर्रेच कळत नाही मराठी बोलणे कुणाची मक्तेदारी आहे का...? मी मराठी आहे म्हणून मराठी बोलते...that's it... त्यात कुठल्या राजकीय पक्षाचा किंवा एखाद्या माणसाचा वारंवार उल्लेख करण्याची काय गरज? आणि माझ्याच राज्यात माझीच भाषा बोलण्याची सहज कृति इतकी noticeable ठरत असेल तर ही खर्रेच काळजीची गोष्ट आहे...!!!