Thursday, February 12, 2009

दहावीचे वर्ष पार्ट 3

परीक्षा संपायच्या आधीच ( actually जवळ जवळ सम्पूर्ण वर्षच ) एवढे प्लान्स केले होते न सुट्टी साठी , पण एकही सत्यात उतरला नाही। दहावीच्या सुट्टी एवढी एकही बोरिंग , irritating, आणि बकवास सुट्टी अनुभवली नव्हती। इतका वीट आला होता न या एवढ्या लांब लचक सुट्टीचा की वाटायचे यापेक्षा परीक्षेचे दिवस बरे होते।
एक तर जेव्हा आपल्याला वेळ आणि इच्छा असते न काही बघायची, तेव्हा t v वर ही काही चांगले नसते। परीक्षा सुरु होती तेव्हा TV वर एक सो एक movies लागायच्या आणि परिक्षे नंतर मात्र ना TV वर काही लागायचे ना FM वर काही चांगली गाणी लागायची। जाम म्हणजे जाम च पकायाला झाले होते।
त्यातून माझ्या बाबांची काकी गेली त्यामुले आमची टूर पण cancel झाली। बर मग दुसरया महिन्यात शिमल्याला जान्या साठी बुकिंग केले तर त्या गुज्जराना उत आला आणि आमचे तेहि जाने cancel। सरते शेवटी मला हैदराबाद च्या ३ दिवसांच्या short ट्रिप वर समाधान मानावे लागले।
असे करता करता रिजल्ट चा दिवस आला। त्याच्या आदली रात्र मी कधी विसरणार नाही। घरी माझे आई बाबानशी जोरदार वाजल। कशावरून ते आठवत नाहिये आत्ता पण प्रचंड चीड आली होती मला तेव्हा। पूर्ण रात्र जागली होती मी टेंशन मूले। शेवटी बरोबर ११ वाजता नेट लावले आणि रिजल्ट कलला आणि मोकले झाल्या सारख वाटले। पण तो दिवस पूर्ण अश्रू धालान्यताच गेला। सगल्या friends चे फ़ोन येत होते समजूत घालायला। बिचारी माझी बेस्ट फ्रेंड स्वताला अपेक्षे पेक्षा कमी मार्क्स मिळून ही माझे सांत्वन करत होती। घरी सगळे तसे नोर्मल होते पण मीच जरा अपसेट होती। ८५% वर commerce ला कुठेही admission मिळेल असे घरचांचे म्हानाने होते पण प्रश्न त्याचा नव्हताच मुळी प्रश्न होता तो अन्यायाचा। ज्यानी अत्ता आत्ताच दहावी दिली आहे त्याना पटेल माझे । खूप झोल असतो हो रिजल्ट मधे। ज्यांचे कधी नाव ही ऐकले नव्हते ते शालेतून पाहिले वैगरे आले होते आणि बिचारी जी मुलगी मान मोडून मेहनत करून दर वर्षी शालेतून पहिली यायची तिचे नाव ही नव्हते कुठे। काही लोकाना तर अक्षरशः jack पॉट्स लागले होते। खूप चीड आली होती तेव्हा। पेपर re चेकिंग ला देऊन काही होत नाही उलट bad luck जोरावर असेल तर मार्क्स कमी होतात म्हणे म्हणून मग पेपर्स re चेकिंग लाही नाही टाकले।
एकूणच काय तर तो जो काळ होता ना माझ्या साडे सातिचा होता। पुढे सरकारने जो काही गोंधळ घातला तो तर विलक्षण च होता। ते पुन्हा कधी तरी.........................

4 comments:

  1. नमस्कार मैडम.
    तुमचा ब्लॊग म्हणजे दिवसेन्दिवस भारीच होऊ राहिलाय हो ~

    सरकार ने काय गोन्धळ घातला म्हणे? :D
    सान्ग की!!

    आणि कन्टाळा ब्लोग लय भारी आहे!

    ReplyDelete
  2. Hi maithili,
    Looks like there is a good writer hidden in you.
    Nice and good looking blog.
    Keep it up.
    Have a look at my blog too here.
    It would be gr8 if you give me some feedback
    marathi-emails.blogspot.com

    ReplyDelete
  3. अग, ८५ टक्के मिळाले म्हणून एवढे वाईट वाटले तुला? आमच्या शाळेत ८५ वाला/वाली म्हणजे देव होते :)
    बाकी ब्लॉग धमाल आहे - मस्तच सुरु आहेत दहावीच्या वर्षाचे पोस्टस. रुयम म्हणाला तसे, सरकारने काय गोंधळ घातला ते पण सांग

    ReplyDelete
  4. छान लिहीलयसं!
    आता अकरावी पार्ट १ टाक.
    आणि एक कर प्लीज, ळ, ण या अक्षरांसाठी shift l आणि n वापर.

    ReplyDelete