प्रीलिम्स चा रिजल्ट लागला तसे सगल्यांचेच भ्रमाचे भोपले फुटले। मला ८२ % होते त्यामुले घरी काही फारशी वाट नाही लागली पण ते ८२% फक्त माझे थोडेच होते? म्हणजे एक मेका सहाय्य करू तत्वावर परीक्षा झाल्याने............ जाउन्देत!!! तर आपण किती पाण्यात आहोत हे ज्याचे त्याला तरी नक्कीच कलले असावे कारण सगलेच नंतर करू, नंतर करू म्हणत साठवलेल्या अभ्यासाचा ढीग उपसत होते।
खरा अभ्यास झाला तो मात्र फक्त half जानेवारी आणि फेब्रुवारीत। त्यातूनही अध्ये मध्ये ओरल्स , practicals साठी शाळेत जाणे सुरु होत। मग त्या पाठोपाठ टाइम पास करणे, उगाच रेंगालाने इत्यादि इत्यादि हे आलेच।
फोटो काढाणे ,slam books भरून घेणे , भरून देणे, फ़ोन नंबर्स घेणे हेही सीरियसली चालू होते। खरेतर दहावीच्या स्ट्रेस मधून बाहेर येण्याचा तो उत्तम मार्ग होता ( अभ्यास करत नसलो म्हणून काय झाल टेंशन तर होताच न )
आणि ek dachaa तो परीक्षेचा दिवस उजाडला। वर्षभर टेंशन घेउन घेउन आता टेंशन च स्टॉक ही संपला होता त्यामुले (निर्लज्ज पणे ) मी आदल्या दिवशी जब वी मेट बघत बसले होते। दुसरया दिवशी सगळे सह कुटुंब सह परिवार मला सेंटर वर सोडायला आले होते। पहिला पेपर मराठीचा होता। हा "शकुनाचा" पहिला पेपर च थोडासा राहीला। त्या मुले जाम ऑफ़ झाला होता मूड। पुढचे सगळे पेपर तसे छान गेले । संस्कृत ला पुन्हा बोम्ब लागली। त्याचे काय झाले की ह्या पेपर च्या आधी ७ दिवस लागोपाठ सुट्टी आली। मग अजून ६ दिवस आहेत , नंतर करू। अजून ५ दिवस आहेत , असे करत करत पेपर चा दिवस आला आणि मग आमचे डोळे खड कन ughadale. मग सकाळी सकाळी ( ९.३० वाजता) उठून थोड़े व्याकरण बघितले। आणि मग अत्ता जे होइल ते होइल ( जो बोले सो निहाल) म्हणून पेपर द्यायला गेले। बाहेर आल्यावर एक एक जन जो उड़त होता न ढगात ते बघून तर अजूनच टेंशन आल । तसा बरा गेला होता पेपर मला म्हणजे निदान व्याकरण तरी नीट आल होते पण इतरांचा उत्साह पाहून जरा भीती वाटत होती।
भूगोलाच्या पेपराला मी नेहमी प्रमाणे घोळ घातलाच। नकाशे आणि ग्राफ पेपर वर प्रश्न क्रमांक च नाही घातले मग त्या सुपर viser ना जरा मस्का लावला ( तरी नशीब ते सर होते एखादी बाई वैगरे असती तर जाम नाटके केली असती।) आणि मिलवला बाबा पेपर परत एकदाचा।
सो, अशी हज्जार नाटके, तमाशे पार पाडून आमची परीक्षा संपली।
हुश , लिहून लिहून दमली मी; बाकी सुट्टी, रिजल्ट आणि admission नंतर कधी तरी। बाय then.........
छान आहे लेख.. :-)
ReplyDelete