प्रसंग १ - मी आणि माझ्या दोन मैत्रिणी गप्पा मारत होतो, आणि विषय होता "आई बाबांची ड्रेसिंग स्टाइल" .
हल्ली आपले आई बाबा बदलले आहेत असे आमचे ठाम मत होते. " शूज पासून ते चष्म्याच्या फ्रेम पर्यंत सगळे च एकदम अपडेट झालेय...म्हणजे त्यांची पूर्वीची ती बोअरिंग स्टाइल सोडून एकदम टकाटक रहत आहेत...completely fresh look झालाय यार त्यांचा..." आणि हे आम्हा कोणाच्याच पचनी पडत नव्हते...म्हणजे त्यांची ती बोअरिंग स्टाइल च बरी होती असे वाटायला लागले होते... "ते असतील dudes/ beauties of their time पण आत्ता ते आपले आई बाबा आहेत यार.... don't you think so की त्यानी आपल्या आई बाबां सारखेच राहिले पाहिजे...???" असा काहीसा (वाईट ) attitude होता आमचा.... अर्थात हे सगळे काही आम्ही त्यांच्या पाशी बोलणार नव्हतो की त्याना तसे वागायला ही लावणार नव्हतो पण मनात कुठेतरी हे सगळे होतेच...
प्रसंग २ - क्लास मध्ये आमची इंग्लिश ची mam कशावरून तरी काहीतरी बोलत होती आणि तिने विचारले की "don't you think your mom n dad needs a privacy...???" आणि आम्ही सगळे च एका सुरात नो म्हणालो . आणि आम्हाला त्याचे काही ख़ास वाटले सुद्धा नाही...
पण गेल्या काही दिवसात असे वाटायला लागलेय की अरे आपण आपल्या आई बाबा ना कित्ती गृहीत धरतो नै...
आपल्या शिवाय त्यांचे दुसरे असे parallel world अस्ताच कामा नये , त्यानी सतत आपल्या आई बाबांच्या च भूमिकेत असेल पाहिजे असे काहीसे...
कित्ती दिवसात आई बाबा एकटेच movie, dinner किंवा shopping ला गेलेच नाहीयेत ...अगदीच काही मोजके प्रसंग सोडले ( जेव्हा मीच नाही येणार असे सांगितले होते ) ते सोडले तर ते मला सोडून only for fun उद्देशाने कुठे गेलेच नाहीयेत....
माझे आई बाबा असण्याच्या आधी ते एकमेकांचे काहीतरी लागतात हे विसरलोच होतो की आपण....म्हणून मग त्यांच्या येत्या anniversary ला "तुम्ही दोघेच जा न कुठेतरी मी कशाला पाहिजे " असा सूर लावला पण ते जे बोलले ना ते ऐकून ज़रा बरे वाटले..."आम्ही तुझ्या जन्माच्या आधी कोणाचेही काहीही असलो ना तरी तू आमच्या आयुष्यात आल्या नंतर सगळ्यात आधी आम्ही आमच्या पिल्लू चे आई बाबा आहोत..."
अर्थात आता याच्या पुढे आम्ही सुद्धा they needs a freedom too... हे लक्षात ठेवायचे ठरवले आहे, मात्र आपल्या शिवाय त्यांचे जग पूर्ण होत नाही तेव्हा अगदीच काही वाईट वाटुन घ्यायचे कारण नाही हे ही आम्हाला कळले आहे..... :)
Friday, May 28, 2010
Thursday, May 20, 2010
शिक्षणाच्या आयचा घो..!!!
काही दिवसां पूर्वी मी माझ्या काका कड़े गेले होते, तिथे एकदम विचारमग्न अवस्थेत माझी बहिण बसली होती. तिला विचारले तर म्हणाली , " ताई , तुझा advise हवाय मला , मी आत्ता अभ्यास करू की नको करू ग...??? नाही म्हणजे आठवी पर्यंत मी तसेही पास होणारच आहे न म्हणून विचारले...." मग मी थोड़े समजावले तिला की अरे आत्ता पास होशील तू पण मग 9th आणि 10th मध्ये तर करावाच लागेल न अभ्यास. आणि खरेतर 4th to 8th चाच अभ्यास जास्त महत्वाचा असतो , आत्ता अभ्यास केलास तर 9th आणि 10th मध्ये जास्त मेहनत नै करावी लागणार तुला वैगरे वैगरे बौद्धिक घेतले तिचे...!!! तिला समजावले पण मीच गोंधळात पडले . अरे काय हे , काडीचा तरी अर्थ आहे का या GR ला...??? आठवी पर्यंत कोणालाही नापास करणार नाही . विद्यार्थ्यां वरचा ताण दूर करण्यासाठी हा उपाय योजला आहे म्हणे...!! (?????)
अरे @ $ #% $& नो जर खरेच असे काही करायचे असेल न तर आधी सावळा गोंधळ कमी करा तुमच्या व्यवस्थेतला . आम्हाला अभ्यास करून ताण नाही येत हो तर मेहनत करून सुद्धा तुमच्या मुर्खपणा mule भोगावया लागणार्या मनस्तापाचा होतो. रोज नव नविन नियम, अटी, कायदे ...आणि बरे त्याच्या वर सुद्धा ठाम रहायचे नाही. percentile पद्धत काय , online admission काय , जिल्हा quota काय ... अगदी अक्कल नाम शून्य असल्या सारखे वागत असतात.
आम्ही नववीत असताना वर्षाला ६ परीक्षा घेण्याचे ठरवले. आम्ही सुटलो खरेतर दोन वर्षात पण अजुनही हा मूर्ख् पणा सुरु आहे...अरे मुले म्हणजे काय ओझ्याची गाढवे वाटली का याना?? आणि मग ह्या वरुन शिव्या खाल्ल्या की "आठवी पर्यंत नापास च करणार नाही " असा फतवा काढायचा...( ह्या नियमाने काय साध्य होणार आहे खरेच कळले नाहीये मला...)
आमच्या दहावी च्या परिक्षेच्या वेळेला , परीक्षा दोन दिवसांवर आलेली असताना Algebra च्या एक chapter मध्ये सुधारणा पाठवल्या. मग आम्ही सगळे शाळेत गेलो, नविन पद्धत शिकलो, त्या नविन problems च्या आणि त्यांच्या method च्या zerox घेतल्या , आमचा पूर्ण दिवस त्याच्या पाठी वाया घालवला आणि आम्हाला परिक्षेच्या दिवशी कळले की जुन्या method ने sums solve केली तरी चालणार आहे .
आमच्या admissions च्या वेळी तर कहर च केला होता...एका जिल्ह्यातल्या लोकाना दुसर्या जिल्ह्यातल्या कॉलेज मध्ये preference नाही ,( हा सुद्धा एक गाधव पणा चा कळस ह्याने पण काय साध्य झाले मला कळले ले नाहीये...नंतर मग त्यांच्या वर केस केली आणि हा नियन काढून टाकला..पण आमचे जे नुकसान व्हायचे होते ते झालेच....)
खेळ वाटतो का याना शिक्षण म्हणजे...??? आणि आम्ही त्यांच्या तालावर नाचणारी खेळणी...??? ह्यांचे हे असे बिनडोक पणाचे GR निघाले न की खरेच म्हणावसे वाटते " ह्या शिक्षणाच्या आयचा घो..." !!!!

Saturday, May 15, 2010
माझी पहिली खादाडी पोस्ट....
आज पर्यंत ब्लॉग विश्वतल्या खाद्य चळ्वळीत माझा मूक सहभाग असायचा , ह्या पुढे मात्र मी सुद्धा सक्रीय व्हायचे ठरवले आहे... खादाडी वर लिहायला कित्ती तरी विषय होते डोक्यात पण पहिली पोस्ट आपल्या सगाल्यान्च्याच आयुष्यात खादाडी ला खर्या अर्थाने सुरुवात करणार्या शाळेतल्या डब्या पासून.... !! इतरांच्या घरातली खाद्य संस्कृति डब्या मुळेच कळते, खादाडी ला सोबत करणारे जीवा भावाचे सोबती इथेच मिळतात म्हणून...!! शाळेत असताना आमचा सगळा ग्रुप अत्यंत खादाड होता, वर्गात शिरल्या बरोबर hiiee, hello करायाच्याही आधी "आज डब्यात काय आहे ?" हे विचारायचो... बाकीचे सगळे आम्हाला खादाड माऊ ग्रुप म्हणायचे... अर्थात त्याला तसे कारण सुद्धा होते, सगळा वर्ग शिस्तीत एक एक डबा आणायचे आणि आम्ही मात्र दोन तीन डबे न्यायचो picnic ला गेल्या सारखे... कधी fruits, कधी स्वीट्स, कधी स्वत: काही ख़ास बनवले असेल तर ते, कधी आजीने करून पाठवलेली लोणची, मुरम्बे ; काही तरी असायचेच. आमच्या ग्रुप ने फक्त पोळी- भाजी खाल्लीये असे झाल्याचे आठवतच नाही, रोजच्या regular डब्या व्यतिरिक्त हे असे subsidiary डबे असायचेच. बर हे सगळे झाल्या नंतर आम्ही "हप्ता वसूली" साठी जायचो, म्हणजे खरेतर आमच्या खाद्य प्रेमाची माहिती असलेले आमचे वर्ग मित्र/मैत्रिणी आम्हाला त्यांचा डबा खायला बोलावायाचे... एकदा अचानक आम्हाला अशी उपरती झाली की अरे एकतर आपण आपले डबे आपल्यातच संपवतो आणि हक्काने जाऊन त्याचे डबे खातो... so, lets stop this...असे ठरले. सो, त्याप्रमाणे आम्ही आमची वसूली बंद केली. एक दोन दिवसंनंतर हे सगळे आमच्या बेंच पाशी हजर, " आला का नाहीत डबा खायला" असा जाब विचारायला ते सुद्धा हातात आमच्या साथी डबे घेउन... :) अजुनही एक वेळ सगळ्यान्ची आडनावे नसतील लक्षात पण कोणाच्या डब्यातले काय काय स्पेशल असायचे ते चांगलेच लक्षात आहे. आणि कोणाच्या आवडीचे असे काही असेल तर आमच्या आया सुद्धा त्या त्या व्यक्ति साठी स्पेशल डबा द्यायच्या. It was not matter of taste only, कारन सगळ्यान कडून recepies घेउन सुद्धा काही ख़ास पदार्थ त्या डब्या तल्या चवीचे बनतच नाहीत... कारण त्यात; " ही चटनी फक्त आणि फक्त मैथिली साठी आहे " असे निक्षून सान्ग्णार्या काकूंचे प्रेम नसते, " I have made this , and its only for you" असे सांगुन इतरांच्या नकळत फक्त मला खायला घालणार्या , Assingnment पूर्ण करण्याच्या घाईत असताना मी जेव्हा डबा अर्धवट टाकुन पळायचे तेव्हा मला स्वता: च्या हाताने भरवणार्या friends चे प्रेम त्यात नसते.....!!! तो डबा , ती मजा मस्ती , गोंधळ , ते प्रेम सगळे खूप खूप miss करत्ये मी........
[ खादाडी पेक्षा Emo च झालीये ही पोस्ट महित्येय मला , पण पहिली पोस्ट मला ह्या विषया वर च टाकायची होती.....] :)
[ खादाडी पेक्षा Emo च झालीये ही पोस्ट महित्येय मला , पण पहिली पोस्ट मला ह्या विषया वर च टाकायची होती.....] :)
Thursday, May 13, 2010
स्नेह मेळावा
खूप खूप खूप मज्जा आली तिथे....!!! जाताना मनात थोड़ी धाकधूक होती, "कसे असतील सगळे? एकतर माझ्या पेक्षा सगळे च जण मोठे... आणि त्यातून मी ज्यांच्याशी ब्लॉग व्यतिरिक्त contact मध्ये आहे ते येणार च नव्हते. so, जरा साशंक च होते मी... पण तिथे गेल्या गेल्या रोहन दादा आणि सुहास दादा ने इतके गोड्ड smile देऊन स्वागत केले की सगल्या शंका विरून गेल्या... आणि पुढचे दोन तीन तास अगदी मज्जेत जाणार याची खात्री पटली...खरेच सगळे खूप खूप छान आहेत... ! आर्यन ( सगळ्यात छोटा ब्लॉगर) फोटो पेक्षा प्रत्यक्षात supper गोड्ड दिसतो...आणि हो त्याच्या ह्या गोड्ड पणाचा source त्याची आई आहे हे सुद्धा कळले. ( फोटो पण काढले आहेत मी त्याचे...पण नंतर तो जरा थकलेला वाटला म्हणून मग फोटो काढणे थांबवले. पहिल्याच भेटीत जास्त irritate करायला नको म्हणून मग शांत बसले... :) ) कांचन ताई पण मस्त आहे अगदी बोलायला.... we r meetng for the first time असे जाणवले च नाही...!! अपर्णा ताई पण खूप छान आहे ( मला chocolate दिले म्हणून नाही हाँ ... खरेच खूप स्वीट आहे ती....) आदित्य दादा भेटला याचा तर जरा जास्तच आनंद झाला कारण ह्या ब्लॉग विश्वात पहिला ब्लॉग त्याचा वाचला होता मी.....आणि त्याची सुपर डुपर fan झाले होते..... !!!
तसे पाहिले सगल्यानाच पण गप्पा मात्र नाही मारता आल्या नीट...एक तर मी जरा लवकरच निघाले ( मैत्रिणी च्या घरी नाईट आउट ला येईन असे promise केले होते हे एक कारण आणि दुसरे म्हणजे मी घरून जास्त खाऊन आले म्हणून मेळाव्याला काही खाल्ले नाही आणि नंतर ७.३० - ८ वाजता खूप भूक लागली होती...)
पण ह्या सगळ्या मुले मी हेरंब दादा चा फ़ोन आणि ग्रुप फोटो miss केला... :(
असो, एकंदरीतच खूप धमाल आली.... so, I have to say THANKS to रोहन दादा, कांचन ताई and महेंद्र काका !
आत्ता पर्यंत माझ्या creation ला लोक माझ्या मुळे ओळखायचे "हे मैथिली ने लिहिलेय" हे नेहमीच ऐकायचे... ह्या वेळी पहिल्यांदाच माझ्या creation मुळे मला ओळख मिळाली होती..." अच्छा ती मैथिली थिंक्स वाली मैथिली तू आहेस तर..." हे ऐकायला खूप मस्त वाटत होते...!!! :) :) :)
पुन्हा भेटूयात मग लवकरच..... आपल्या राहिलेल्या गप्पा मारायला..... :)

Wednesday, May 5, 2010
माझा बालिशपणा
हेरंब दादा ने टाकलेल्या पोस्ट मुळे मी सुद्धा inspire झाले ह्या विषयावर लिहायला.... तर मी बालिश आहे असे सगळे म्हणतात, मैथिली साठी सिमिलर वर्ड म्हणजे childishness असे माझ्या मित्र मंडळाचे ठाम मत आहे...
आणि हो मला सुद्धा मान्य आहे हे... मी वागतेच तसे...
१ मी मस्त पैकी bright colours वापरते...( हे सुद्धा एक बालिशपणा चे लक्षण आहे आजकाल ) [ त्यामुले आमच्यात पोल्का dots , मोठी मोठी फुले , कार्टून characters असलेल्या कपड्या ना मैथिली'स स्टाइल असे नाव पडले आहे ]
२ हेल्लो किटी , bunny, मिक्की माउस , पूह etc ची stationary वापरते।
३ भर पावसात छत्री मिटून चालते, पावसाळ्य़ात साचलेल्या डबक्यात उडी मारते
४ मेल्ट झालेली मऊ मऊ chocolates खायला मला प्रचंड आवडते
५ मी आजूबाजूच्या लहान मुलांशी त्यांचे खेळ खेळते
खरेतर अजुन बरेच काही आहे पण सद्ध्या आठवत नाहीये माझे मलाच की मी काय काय बालिशपना करते...
आणि मला नाही लाज वाटत बुवा हे सगळे करायला...
फिल्मी gossips , इतरांची affairs ह्या गप्पां पेक्षा , " तिथे boundry , इथे सिक्स आणि त्या तिथे directआउट हाँ..." हयात जास्त मज्जा येते मला। ABC ने XYZ ला काय गिफ्ट दिले ह्या वर चर्चा करण्या पेक्षा वाळू चा किल्ला करायला आवडते मला... Whts wrong in it yaar??? I proud to b childish....
अर्थात माझे friends मला जरा जास्तच बच्चू समजतात। त्याना काही ख़ास बोलायाचे असेल तर " बाल मनावर वाईट परिणाम होतील " असे सांगुन दूर पाठवतात। त्यांचे काही जोक्स सुरु असतील आणि एखाद्याला ते कलले नाही तर मला समजले का विचारतात आणि मी हो उत्तर दिल्या वर " देख इस छोटू को भी समझा यार..." असे म्हणतात... , road cross करताना माझा हात पकडतात...पण असो त्यामुले माझे चांगले लाड होतात, हट्ट पुरवले जातात...
so, मी enjoy करते हे सगळे... मला जेव्हा जेव्हा जे जे करावासे वाटते मी कशाचीही पर्वा न करता करू शकते हेच काय कमी आहे????

Subscribe to:
Posts (Atom)