Saturday, May 15, 2010

माझी पहिली खादाडी पोस्ट....

आज पर्यंत ब्लॉग विश्वतल्या खाद्य चळ्वळीत माझा मूक सहभाग असायचा , ह्या पुढे मात्र मी सुद्धा सक्रीय व्हायचे ठरवले आहे... खादाडी वर लिहायला कित्ती तरी विषय होते डोक्यात पण पहिली पोस्ट आपल्या सगाल्यान्च्याच आयुष्यात खादाडी ला खर्या अर्थाने सुरुवात करणार्या शाळेतल्या डब्या पासून.... !! इतरांच्या घरातली खाद्य संस्कृति डब्या मुळेच कळते, खादाडी ला सोबत करणारे जीवा भावाचे सोबती इथेच मिळतात म्हणून...!! शाळेत असताना आमचा सगळा ग्रुप अत्यंत खादाड होता, वर्गात शिरल्या बरोबर hiiee, hello करायाच्याही आधी "आज डब्यात काय आहे ?" हे विचारायचो... बाकीचे सगळे आम्हाला खादाड माऊ ग्रुप म्हणायचे... अर्थात त्याला तसे कारण सुद्धा होते, सगळा वर्ग शिस्तीत एक एक डबा आणायचे आणि आम्ही मात्र दोन तीन डबे न्यायचो picnic ला गेल्या सारखे... कधी fruits, कधी स्वीट्स, कधी स्वत: काही ख़ास बनवले असेल तर ते, कधी आजीने करून पाठवलेली लोणची, मुरम्बे ; काही तरी असायचेच. आमच्या ग्रुप ने फक्त पोळी- भाजी खाल्लीये असे झाल्याचे आठवतच नाही, रोजच्या regular डब्या व्यतिरिक्त हे असे subsidiary डबे असायचेच. बर हे सगळे झाल्या नंतर आम्ही "हप्ता वसूली" साठी जायचो, म्हणजे खरेतर आमच्या खाद्य प्रेमाची माहिती असलेले आमचे वर्ग मित्र/मैत्रिणी आम्हाला त्यांचा डबा खायला बोलावायाचे... एकदा अचानक आम्हाला अशी उपरती झाली की अरे एकतर आपण आपले डबे आपल्यातच संपवतो आणि हक्काने जाऊन त्याचे डबे खातो... so, lets stop this...असे ठरले. सो, त्याप्रमाणे आम्ही आमची वसूली बंद केली. एक दोन दिवसंनंतर हे सगळे आमच्या बेंच पाशी हजर, " आला का नाहीत डबा खायला" असा जाब विचारायला ते सुद्धा हातात आमच्या साथी डबे घेउन... :) अजुनही एक वेळ सगळ्यान्ची आडनावे नसतील लक्षात पण कोणाच्या डब्यातले काय काय स्पेशल असायचे ते चांगलेच लक्षात आहे. आणि कोणाच्या आवडीचे असे काही असेल तर आमच्या आया सुद्धा त्या त्या व्यक्ति साठी स्पेशल डबा द्यायच्या. It was not matter of taste only, कारन सगळ्यान कडून recepies घेउन सुद्धा काही ख़ास पदार्थ त्या डब्या तल्या चवीचे बनतच नाहीत... कारण त्यात; " ही चटनी फक्त आणि फक्त मैथिली साठी आहे " असे निक्षून सान्ग्णार्या काकूंचे प्रेम नसते, " I have made this , and its only for you" असे सांगुन इतरांच्या नकळत फक्त मला खायला घालणार्या , Assingnment पूर्ण करण्याच्या घाईत असताना मी जेव्हा डबा अर्धवट टाकुन पळायचे तेव्हा मला स्वता: च्या हाताने भरवणार्या friends चे प्रेम त्यात नसते.....!!! तो डबा , ती मजा मस्ती , गोंधळ , ते प्रेम सगळे खूप खूप miss करत्ये मी........
[ खादाडी पेक्षा Emo च झालीये ही पोस्ट महित्येय मला , पण पहिली पोस्ट मला ह्या विषया वर च टाकायची होती.....] :)

26 comments:

 1. @ Anand dada, Mi madhye khadadi war ek post takun ti delete keli hoti ti hich post...( tu wicharale hotas na mala, sorry tyala uttar dyayala jamlech nai..)Tyat baryaach chooka hotya re mhanun mag doorust karun aaj publish keli hi post....

  ReplyDelete
 2. मैथीली.. मस्त पोस्ट झालीयं. खादाडी म्हणजे केवळ खाण्याच्या गोष्टींची यादी नसते.. तू जे काही लिहिलेस ते सुद्धा यात असतेच..

  मी शाळेत असताना असेच असायचे. आमचा १५ जणांची टोळी होती, सर्वांचे वेगवेगळे डबे आणि उत्तम पदार्थ खाताना कसली सही मजा यायची..आणि नुसतं इंटरवल नाहीतर तास चालू असताना सुद्धा आम्ही तोंड न हलवता खायचो ;-).. कधी पकडलो गेलो नाहीत...;-) खरंच आता हे सगळं मिस करत आहे..

  मेळाव्यात मी तुला पाहीलेच नाही... तूला बोलायचं होतं बच्चु ;-)

  ReplyDelete
 3. Are ho hya adhalya madhalya khanya baddal rahilach ki lihayache... jaam dhamaal yaychi hya asha
  " Bhumigat Karavaaya " karayalaa..... :D
  Are ho na mala sudha tula bhetayachi khoop icha hoti re dada...aso pudhachya weli nakki...

  ReplyDelete
 4. वा ! मजा आली वाचायला. आम्ही पण शाळेत असंच करायचो. एका बेंच वर जमा होऊन सगळ्यांनी आपापले डबे उघडायचे आणि मग कोणाच्याही डब्यावर हात मारायचा. कोणी काही स्पेशल(म्हणजे बटाट्याची कापं किंवा फरसाण वगैरे. तेव्हा आमची मजल तेवढीच होती) आणलं असेल तर त्याचा डबा अक्षरश: एका मिनिटात संपायचा. सगळं आठवलं ते.
  मस्त झालीए पोस्ट.

  ReplyDelete
 5. आमच्या वर्गात एका मुलाचा डबा हा मोस्ट वॉन्टेड होता. सगळे पहिल्याप्रथम त्याच्या बेंचभोवती गोळाअ व्हायचे. मग तो सत्ते पे सत्ता तल्या अमिताभसारखा दोन पोळ्या आधी काढून घ्यायचा आणि मग ऍटॅक...
  त्याचा डबा ५ मिनिटांत संपायचा आणि मग बाकी सगळ्यांचे डबे एक एक करून त्याच बेंचवर उघडायचे. जाम मजा यायची.
  ह्या सगळ्या आठवणी करून दिल्याबद्दल धन्यवाद. मस्त झालीये पोस्ट!

  ReplyDelete
 6. मस्त लिहिली आहेस. लहानपण आठवलं.. :)

  ReplyDelete
 7. वा छोटु छान लिहलस...तास चालु असतांना डब्बा (म्हणजे त्यातील पदार्थ) खायचा पराक्रम आम्ही देखील करायचो...बाकी शीळेतील खादाडीची गोष्टच निराळी..गेले ते दिवस,राहिल्य त्या आठ्वणी...

  ReplyDelete
 8. मस्तच लिहीलयेस गं... अगदी शाळेतले दिवस आठवले.... मी आणि माझी एक मैत्रीण पहिली ते दहावी रोज डबा अदलाबदली करायचो... आमच्या आयांना शेवटपर्यंत कळु नव्हते दिले पण आम्ही आमचे सिक्रेट :)

  ReplyDelete
 9. Kshitij dada, hehe...:D are aamhi pan asach phadasha padayacho...agdi dushkaal grastansarakhe...!!! :)

  ReplyDelete
 10. Vidyadhar dada, hehe.. :D Thanks...!!!

  ReplyDelete
 11. Mahendra kaka, Devendra dada Thanks...!!!

  ReplyDelete
 12. मैथिली ताई, मी तुझ्यापेक्षा एक वर्षाने लहान आहे.

  ReplyDelete
 13. okk.... Kshitij...mala maithili taai mhanu nakos....! Are ithe sagalyanach dada mhananyachi savay laagaliye...aso, tu matr mala Maithili ch mhan...!!!

  ReplyDelete
 14. Naahi re...nahiye ajun tari..banavayache aahe..!!!

  ReplyDelete
 15. वॉव. झक्कास लिहिलं आहेस. खादाडी विथ इमो.. एकदम मस्त कॉम्बो !! आवडेश...

  शाळेत आमचा चौघांचा ग्रुप होता. सगळेजण आम्हाला चांडाळ-चौकडी म्हणायचे. त्यावर आमचं उत्तर असायचं की आमची चौकडी आणि तुम्ही चांडाळ ;) !! प्रतिक्रिया द्यायला उशीर झाला त्याबद्दल सॉरी..

  ReplyDelete
 16. Are sorry kaay...?? Kahitarich...!!!
  Pan mi kharech tujhya commnets chi khoop manapasoon vaat baghat aste... :)

  ReplyDelete
 17. khadadi chi suruwat herambo dada chya khadad giri warunach na? :D
  mast emo khadadi..

  lihi lihi..

  ReplyDelete
 18. Hehe..nahi agdich tase kahi nahi. ekun sagalyanchi ch ji khadad giri suru aste tya warun... :D
  Aani thank u...tujhya comments chi suddha khoop vaat baghat aste mi... :)

  ReplyDelete
 19. अरे ऋयामा, माझी खादाडी काहीच नाही. इथे एकसेएक खादाड लोक आहेत. खादाडीवर स्वतंत्र ब्लॉग्स आहेत :)

  ReplyDelete
 20. बच्चु, मस्त पोस्ट, शाळेचे दिवस आठवले..वर्गात घुसल्याबरोबर पहिला तास संपायच्या आत चांगला स्पेशल खाण असलेले डबे रिकामे व्हायचे..जे उरले ते कधी बेंचखाली पेन शोधण्याच्या नावाखाली एकएक इडली तोंडात कोंब, डेस्कवर डोक ठेवून हळूच एक चपातीचा घास खायचा असे संपवायाचे..खूप खूप धम्माल केली होती..तुझी पोस्ट वाचताना सगळा आठवला बघ एकदम..मस्त

  ReplyDelete
 21. Thank you re dada....!!!
  "कधी बेंचखाली पेन शोधण्याच्या नावाखाली एकएक इडली तोंडात कोंब, डेस्कवर डोक ठेवून हळूच एक चपातीचा घास खायचा असे संपवायाचे.."
  Same here... :D

  ReplyDelete
 22. आत्तापर्यंत मला वाटत होते की मी तुझा ब्लॉग फोल्लो करतोय म्हणुन ... :( बरेच पोस्ट चुकवले आहेत की... :) आता वाचून काढतोच... :)

  ReplyDelete