काही दिवसां पूर्वी मी माझ्या काका कड़े गेले होते, तिथे एकदम विचारमग्न अवस्थेत माझी बहिण बसली होती. तिला विचारले तर म्हणाली , " ताई , तुझा advise हवाय मला , मी आत्ता अभ्यास करू की नको करू ग...??? नाही म्हणजे आठवी पर्यंत मी तसेही पास होणारच आहे न म्हणून विचारले...." मग मी थोड़े समजावले तिला की अरे आत्ता पास होशील तू पण मग 9th आणि 10th मध्ये तर करावाच लागेल न अभ्यास. आणि खरेतर 4th to 8th चाच अभ्यास जास्त महत्वाचा असतो , आत्ता अभ्यास केलास तर 9th आणि 10th मध्ये जास्त मेहनत नै करावी लागणार तुला वैगरे वैगरे बौद्धिक घेतले तिचे...!!! तिला समजावले पण मीच गोंधळात पडले . अरे काय हे , काडीचा तरी अर्थ आहे का या GR ला...??? आठवी पर्यंत कोणालाही नापास करणार नाही . विद्यार्थ्यां वरचा ताण दूर करण्यासाठी हा उपाय योजला आहे म्हणे...!! (?????)
अरे @ $ #% $& नो जर खरेच असे काही करायचे असेल न तर आधी सावळा गोंधळ कमी करा तुमच्या व्यवस्थेतला . आम्हाला अभ्यास करून ताण नाही येत हो तर मेहनत करून सुद्धा तुमच्या मुर्खपणा mule भोगावया लागणार्या मनस्तापाचा होतो. रोज नव नविन नियम, अटी, कायदे ...आणि बरे त्याच्या वर सुद्धा ठाम रहायचे नाही. percentile पद्धत काय , online admission काय , जिल्हा quota काय ... अगदी अक्कल नाम शून्य असल्या सारखे वागत असतात.
आम्ही नववीत असताना वर्षाला ६ परीक्षा घेण्याचे ठरवले. आम्ही सुटलो खरेतर दोन वर्षात पण अजुनही हा मूर्ख् पणा सुरु आहे...अरे मुले म्हणजे काय ओझ्याची गाढवे वाटली का याना?? आणि मग ह्या वरुन शिव्या खाल्ल्या की "आठवी पर्यंत नापास च करणार नाही " असा फतवा काढायचा...( ह्या नियमाने काय साध्य होणार आहे खरेच कळले नाहीये मला...)
आमच्या दहावी च्या परिक्षेच्या वेळेला , परीक्षा दोन दिवसांवर आलेली असताना Algebra च्या एक chapter मध्ये सुधारणा पाठवल्या. मग आम्ही सगळे शाळेत गेलो, नविन पद्धत शिकलो, त्या नविन problems च्या आणि त्यांच्या method च्या zerox घेतल्या , आमचा पूर्ण दिवस त्याच्या पाठी वाया घालवला आणि आम्हाला परिक्षेच्या दिवशी कळले की जुन्या method ने sums solve केली तरी चालणार आहे .
आमच्या admissions च्या वेळी तर कहर च केला होता...एका जिल्ह्यातल्या लोकाना दुसर्या जिल्ह्यातल्या कॉलेज मध्ये preference नाही ,( हा सुद्धा एक गाधव पणा चा कळस ह्याने पण काय साध्य झाले मला कळले ले नाहीये...नंतर मग त्यांच्या वर केस केली आणि हा नियन काढून टाकला..पण आमचे जे नुकसान व्हायचे होते ते झालेच....)
खेळ वाटतो का याना शिक्षण म्हणजे...??? आणि आम्ही त्यांच्या तालावर नाचणारी खेळणी...??? ह्यांचे हे असे बिनडोक पणाचे GR निघाले न की खरेच म्हणावसे वाटते " ह्या शिक्षणाच्या आयचा घो..." !!!!
maithili, agadi khare aahe. mala dahawi howun barich varshe zali aani tevha paristhiti khoopach changali hoti mhanaychi! kharach "khel-khandoba" karun takalay sagalach :(
ReplyDeleteआताचा तो राधाकृष्ण विखे पाटील, त्याच्या आधी वसंत पुरके आणि त्याच्या आधी पण असाच एक वेडसर मनुष्य (नाव विसरलो त्याचं).. हे असले लोक शिक्षणमंत्री म्हणून लाभलेत महाराष्ट्राला हे आपलं सगळ्यात मोठं दुर्दैव !! लवकरात लवकर महाराष्ट्राला एखादा किमान average सामान्य ज्ञान असणारा मनुष्य शिक्षणमंत्री लाभो हीच प्रार्थना !!
ReplyDelete"एखादा किमान average सामान्य ज्ञान " +1!
ReplyDeleteMedha taai, ho na ga...Kehl khandoba ch karun taklay sagala... :(
ReplyDeleteHeramb dada, are to vikhe patil paravadala..pan to purake taap hotaa aamachya dokyala..javal javal roj shimaga sajara karayacho aamhi ( aamche shikshak sudha ) tyachya navane...!!!
ReplyDelete>>लवकरात लवकर महाराष्ट्राला एखादा किमान average सामान्य ज्ञान असणारा मनुष्य शिक्षणमंत्री लाभो हीच प्रार्थना !!
He..ha... lets hope so...!!!
अरे @ $ #% $& नो जर खरेच असे काही करायचे असेल न तर आधी सावळा गोंधळ कमी करा तुमच्या व्यवस्थेतला .
ReplyDeleteMaithili tai la evadh chidalel kadhi me tari pahil nahi.... :)
>>लवकरात लवकर महाराष्ट्राला एखादा किमान average सामान्य ज्ञान असणारा मनुष्य शिक्षणमंत्री लाभो हीच प्रार्थना !!
Hahahaha..... khupach bhaari.....
अपेक्षाभंग करण्यासाठीच शिक्षणमंत्री नेमतात आपल्याकडे...आधी राजकारणाच्या शिक्षणाच्या नावाने ह्यांची बोंब असते आणि मग शिक्षणाचं राजकारण करायला जातात आणि तोंडावर पडतो आपण. आपण अख्खी पिढी नासवतोय ह्याचंही भान नसतं ह्या लोकांना. वाट पहायची दिवस बदलायची!
ReplyDeleteमस्त मांडलयंस!
@ Abhishek dada,
ReplyDelete"Maithili tai la evadh chidalel kadhi me tari pahil nahi.... :)"
Kase paahnaar..?? Tu tar pahilyandach yeto aahes na mazya blog war...??? Are hya aadhi chya pan baryach posts madhye zaliye chidchid.. ;)
Neways...Thnks for coming here...!!!
Vidyadhar dada,
ReplyDeleteअपेक्षाभंग करण्यासाठीच शिक्षणमंत्री नेमतात आपल्याकडे..agdi agdi khare re...
Neways , Thanks...!!! :)
काय लिहावे अजुन? तुझा लेख आणि सगळ्यांच्या प्रतिक्रिया बोलक्या आहेत. परिक्षा रद्द करण्यापेक्षा परिक्षा पद्धती बदलली पाहिजे.
ReplyDeleteHo na re dada...neways...thnks...!!!
ReplyDeleteलवकरात लवकर महाराष्ट्राला एखादा किमान average सामान्य ज्ञान असणारा मनुष्य शिक्षणमंत्री लाभो हीच प्रार्थना !!
ReplyDeletehaa haa haa ... great ... amen
अग तस काही नाही मी नियमीत वाचक आहे तुझ्या ब्लॉगचा, फरक एवढाच की आज पहिल्यांदा कमेंट दिली आहे... :)
ReplyDeleteVijay dada, :)
ReplyDeleteOkok....Are mala vatale pahilyandach aala aahes ithe...!!!
ReplyDelete>>> मी नियमीत वाचक आहे तुझ्या ब्लॉगचा
Thank you..thank you... :)
Yet jaa asach...aani ho commnets pan det ja...
Hey all the best 4 results !!
ReplyDeleteKiti % milale ?
अभिनंदन मैथिली.....सुहासच्या ब्लोग वर तुझे मार्क्स पहिले....आता पुढे काय?
ReplyDeleteaagdi manatle lihles... He lok bahutek aapla desh lavakarach viktil....
ReplyDeleteVikayala suruwaat keli suddha...
ReplyDeleteAso, Blog war tumache swagat...
yet raha asech
आपले राजकारणी म्हणजे आपल्याला संयमाचे धडे देण्यासाठी नेमलेली माणसं असतात. त्यांच्या प्रत्येक गोष्टीत राग येण्याला स्कोप असतो. या एवढ्या सगळ्या रागांवर मात करूनही जो माणूस नॉर्मल आयुष्य जगू शकतो तोच निर्वाणाप्रत पोचतो. तेव्हा रागावण्यात काही पॉइंट नाही. कारण कोणीही सुधारणार्यातलं नाही. आपण आपली निर्वाणाप्रत पोचण्याची तयारी करायची.
ReplyDelete